Chavan-Pawar-Keram Sarkarnama
मराठवाडा

नांदेड जिल्ह्यातील तीन नगरपंचायतीच्या निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

संतोष जोशी

नांदेड ः नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची काल शेवटची तारीख होती. स्थानिक पातळीवरच्या निवडणुका असल्यामुळे इथे कुणी स्वबळावर तर कुणी एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु स्वबळ की आघाडी याचा अंतिम फैसला उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशीच स्पष्ट होईल.

नांदेड जिल्ह्यातील तीन नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. या निमित्ताने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह शिवसेना-भाजप, राष्ट्रवादी, एमआयएम, वंचित अशा सगळ्याच पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केले.

अर्धापूर नगरपंचायतींसाठी येथे १५० , माहूर १४० आणि नायगावसाठी ८७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. कांग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम या पक्षांनी स्वतंत्र उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. तीनही नगर पंचायतीत प्रत्येकी १७ जागांसाठी निवडणूक होत असून, १३ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.

२१ डिसेंबर रोजी मतदान तर २२ तारखेला मतमोजणी होणार आहे. अर्धापूर नगरपंचायतीत पालकमंत्री अशोक चव्हाण, माहुर मध्येभाजप आमदार भिमराव केराम, राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रदीप नाईक, शिवसेनेचे जोतिबा खराटे यांची तर नायगावमध्ये भाजप आमदार राजेश पवार, कांग्रेसचे माजी आमदार वसंतराव चव्हाण या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नगरपंचायत आपल्या ताब्यात यावी यासाठी सगळ्यांनी जोर लावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT