Uddhav Thackeray -Sanjay Shirsat News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat News : निवडणूक आयोगाचा निकाल लागू द्या, उद्धवसेनेत कुणीच राहणार नाही..

Shivsena : अनेक आमदार, खासदार, मुंबईतील विभागप्रमुख, शाखाप्रमुख, माजी नगरसेवक शिंदेंसोबत येण्यास इच्छूक आहेत.

सरकारनामा ब्युरो

Marathwada Political : खरी शिवसेना, धनुष्यबाण कोणाचा? पक्षप्रमुख कोण? या सगळ्या गोष्टींचा निकाल निवडणूक आयोगापुढे सुरू असलेल्या सुनावणी आणि १७ तारखेच्या निकालानंतर लागणार आहे. खरी (Shivsena) शिवसेना आमचीच असा दावा ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाकडून केला जातोय. या संदर्भाती कागदोपत्री पुरावे देखील दोन्ही बाजुंनी निवडणूक आयोगापुढे सादर केले आहेत.

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना पार्श्वभूमीवर निकाल आमच्याच बाजूने लागेल, १७ तारखेनंतर उद्धव ठाकरेंच्या सेनेत कोणीच राहणार नाही, असा दावा केला आहे. (Shivsena) औरंगाबादेत बोलतांना त्यांनी शिवसेनेत यापुर्वी सगळ्या संघटनात्मक निवडणुका या बिनविरोध केल्या जायच्या, तिथे निवडणुका होतच नव्हत्या. आम्ही उठाव केल्यानंतर कुठे आता पक्षांतर्गत निवडणुका घेतल्या जात असल्याचेही शिरसाट म्हणाले.

यापुर्वी पक्षात निवडणुका कशा व्हायच्या हे मी जवळून पाहिले आहे. नेते ठरवायचे आणि बिनविरोध निवड केली जायची. पण आता आमच्या उठावानंतर त्यांना संघटनात्मक निवडणुका खऱ्या पद्धतीने घ्याव्या लागत आहेत. खरी शिवसेना कोणाची, नेते कोण? याचा फैसला १७ तारखेला लागणार आहे. आमच्याकडे ४० आमदार, १२ खासदार आहेत, आमची ताकद मोठी आहे, त्यामुळे निकाल आमच्याच बाजूने लागेल.

एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे प्रमुख नेते ठरतील. त्यामुळे अनेकजण जे कुंपणावर आहेत, ते १७ तारखेच्या निकालाकडे डोळे लावून बसले आहेत. एकदा निवडणूक आयोगाच्या निर्णयाने शिक्कामोर्तब झाले, की उद्धव ठाकरे सेनेते कोणीच राहणार नाही.

अनेक आमदार, खासदार, मुंबईतील विभागप्रमुख, शाखाप्रमुख, माजी नगरसेवक, पदाधिकारी शिंदेसाहेबांसोबत येण्यास इच्छूक आहेत. उद्धव ठाकरे यांना तर पक्षाचं प्रमुख पद देखील गमावावे लागेल आणि एकनाथ शिंदे हेच बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते होतील, असा विश्वास देखील शिरसाट यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT