Sanjay Raut, Pankaja Munde
Sanjay Raut, Pankaja Munde Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Raut : गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणेच पंकजानींही संघर्ष करावा; गोपीनाथ गडावरुन राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

सरकारनामा ब्यूरो

Sanjay Raut at Gopinath Gad : केंद्रात अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणी यांच्या काळातील भाजप आणि राज्यात गोपीनाथ मुंडे यांची भाजप पाहिली आहे. त्यांच्या कामाची पद्धत जवळून अनुभवली आहे. आता केंद्रात आणि राज्यातही पूर्वीसारखी भाजप राहिलेली नाही. आताच्या भाजपमध्ये खूप फरक पडला आहे, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोकले.

बीड येथे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची शनिवारी (ता. २०) जाहीर सभेचे आयोजन केले आहे. तत्पुर्वी राऊत यांनी गोपीनाथ गडाला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. गोपीनाथ गडावर राऊत यांनी मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

राऊत म्हणाले, "गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) दिलदार, दिलखुलास व्यक्तिमत्व होते. त्यांची बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गाढ श्रद्धा होती. शिवसेना आणि भाजप हे रक्ताचे भाऊ आहेत. त्यामुळे युती टिकावी हे त्यांचे कायम स्वप्न होते. त्याबाबत त्यांनी जाहीर भूमिका मांडली होती. ते असते तर भाजप-शिवसेनेतील नाते कायम राहिले असते."

पंकजा मुंडे यांची भाजपमध्ये घुसमट होतेय. त्यांच्या कारखान्यावर धाडी टाकल्या जातात. यावर राऊत म्हणाले, "गोपीनाथ मुंडे राजकारणात निडरपणे वावरले. सर्व संकटांशी दोन हात करून झुंजले. त्यातून अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली. तीच अपेक्षा त्यांची मुलगी म्हणून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याकडून आहे. त्यांनीही संघर्ष केला पाहिजे. येणाऱ्या संकटांशी त्यांनी झुंजले पाहिजे."

२०१६ ची नोटबंदी पूर्णपणे फेल झाल्याचा आरोपही यावेळी राऊत यांनी केला. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांची फाशीची इच्छा जनतेने पूर्ण केली पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला. राऊत म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आता कबुली द्यावी की मी देशाचे नुकसान केले. महागाई वाढविली. नोटबंदीमुळे काळा पैसा येईल, असा दावा केला होता. अतिरेक्यांचा निधी खंडीत होईल, असा दावा केला होता. तो फोल ठरला आहे. आता चौकाचौकात फाशीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांची इच्छा पूर्ण केली पाहिजे. किंवा त्यांनी स्वतःच वधस्तंभाकडे जायला पाहिजे."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT