Dr.Bhagwat Karad News
Dr.Bhagwat Karad News Sarkarnama
मराठवाडा

DR.Bhagwat Karad News : `प्रधानमंत्री स्वनिधी` तून आता फेरीवाल्यांनाही १० ते ५० हजारापर्यंत कर्ज ..

सरकारनामा ब्युरो

Marathwada : प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला व्यवसायासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासोबतच त्यांची आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले. (Narendra Modi) पीएम स्वनिधी महोत्सव अंतर्गत लाभार्थ्यांना कराड यांच्या हस्ते कर्ज वाटप करण्यात आले. ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेचे अधिकाधिक प्रमाणात आर्थिक समावेशन झाल्यास देशाच्या अर्थकारणाला गती मिळेल असेही कराड म्हणाले.

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला व्यवसायासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांची आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी बँकांचा पुढाकार महत्वाचा ठरणार आहे. (Dr.Bhagwat Karad) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशात विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. (Bjp) बँक खाते नसलेल्यांचे खाते उघडणे, विमा योजनेचा सर्वसामान्यांना लाभ देणे आणि अर्थ सहाय्यापासून वंचित असलेल्यांना ते उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

महानगरपालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांना केंद्रीय योजनेचा लाभ देण्यासाठी आणि त्यासंबंधीची जागरुकता वाढवण्यासाठी सबंधित यंत्रणांनी पुढाकार घ्यावा. फेरीवाल्यांचे बँकेत खाते, आधार आणि महानगरपालिकेत नोंदणी असल्यास त्यांना स्वनिधी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. (Marathwada) प्रथम १० हजार रुपये कर्ज आणि वेळेवर परतफेड केल्यास नंतर २० हजार व त्यानंतर ५० हजार रुपये कर्ज देण्यात येईल.

योजनेतून फळविक्रेते, भाजीविक्रेते तसेच फेरीवाले व छोटे व्यावसायिक यांच्या कौटुंबिक अर्थव्यवस्थेला हातभार लागणार आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ शहरीसोबतच ग्रामीण भागात देण्यासाठी बँकांनी काम करावे तसेच गरजू नागरिकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

देशात सुमारे ४९ कोटी जनधन खाते सुरू करण्यासोबत या खात्यांशी आधार व मोबाईल जोडणी केल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत पोहोचविणे शक्य झाले. प्रधानमंत्री आयुषमान भारत योजना, उज्वला गॅस योजना यासह विविध योजनेतून सर्वसामान्यांना आधार देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे कराड यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT