Imtiyaaz Jaleel, Sandipan Bhumre, Chandrakant Khaire Sarkarnama
मराठवाडा

Sandipan Bhumre On Lok Sabha Result : पहिला नंबर माझाच; खैरे-इम्तियाज यांच्यात दुसऱ्या नंबरसाठी स्पर्धा, भुमरेंचा दावा

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Election News: मी एक लाख मतांनी निवडून येणार, रोजगार हमी योजना मंत्री म्हणून मी राज्यात भरपूर काम केलं, लोकांनी मला भरभरून मतदान केलं आहे. त्यामुळे खैरे-इम्तियाज जलील यांनी दुसऱ्या क्रमाकांसाठी स्पर्धा करावी, असा टोला लगावत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी विजयाचा दावा केला आहे.

लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीची मतमोजणी जसजशी जवळ येत आहे, तशी उमेदवारांची उत्सुकता वाढली आहे. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील महायुती, महाविकास आघाडी आणि एमआयएमच्या (MIM) उमेदवारांच्या तिरंगी लढतीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अशातच महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी विजायाचा दावा करत स्पर्धा फक्त दुसऱ्या नंबरसाठी असल्याचं सांगत इम्तियाज जलील व चंद्रकांत खैरेंना चिमटा काढला आहे. (Imtiaz Jalil and Chandrakant Khaire)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एका वृत्तवाहिनीशी बोलतांना भुमरे यांनी प्रतिस्पर्धी महाविकास आघाडी ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे निष्क्रिय असल्याची टीका केली. तर यावेळी बोलताना ते म्हणाले, निकालाची धाकधूक आपल्या मनात अजिबात नाही. माझा विजय निश्चित होणार आहे, 1 लाखाच्या मताधिक्याने माझा विजय होईल. पालकमंत्री, रोजगार हमी योजना मंत्री म्हणून महाराष्ट्रात आणि जिल्ह्यात मी केलेलं काम लोकांनी पाहिलं आहे.

जे रोजगार हमी व फलोत्पादन खाते दुय्यम समजले जात होते, ते माझ्यामुळे नावारुपाला आले. सर्वाधिक निधी या खात्याला माझ्या काळात मिळाला. शेतकरी, फळबाग उत्पादकांना याचा मोठा फायदा झाला आहे. त्यामुळे ते माझ्या पाठीशी उभे राहिलेले निवडणुकीच्या निकालानंतर दिसेल.

इम्तियाज जलील, चंद्रकांत खैरे यांनी एकमेकांशी स्पर्धा करावी. पण ती केवळ नंबर दोन आणि तीनला कोण राहणार यासाठी, असं म्हणत नंबर एकला आपणच राहणार असल्याचा विश्वास भुमरे यांनी व्यक्त केला असला तरी या मतदारसंघातून नेमका कोणाचा विजय होणार हे येत्या चार जूनला स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT