Latur News, 08 August : प्रत्येक निवडणुकीतील डाव वेगळा असतो. लोकसभा निवडणुकीत निलंगा मतदारसंघातून भाजपला कमी मतदान पडले. काँग्रेसला वीस हजाराची लीड मिळाली, पण विधानसभेला तसं होणार नाही, असा विश्वास भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी व्यक्त केला आहे.
तसंच, मुस्लिम समाजाने लोकसभा निवडणुकीत जे केलं ते विधानसभेत नक्कीच करणार नाहीत, असंही निलंगेकर यांनी म्हटलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत.
एकीकडे लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीतील यशामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. तर दुसरीकडे भाजपमध्ये (BJP) काही प्रमाणात निराशा आहे. मात्र, काहीही करुन लोकसभेची पुनरावृत्ती न करता विधानसभेला मोठं यश मिळवण्यासाठी भाजपचे नेते कामाला लागले आहेत.
यासाठी ते कार्यकर्त्यांना आपलाच विजय होणार हा विश्वास देण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच आता मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील निलंगा मतदारसंघाचे आमदार संभाजी निलंगेकर यांनी लोकसभेत काँग्रेसला (Congress) जास्त मतदान मिळालं मात्र, विधानसभेला तसं होणार नसल्याचं म्हटलं आहे.
तसंच त्यांनी काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांच्यावर निशाणा साधला. ते निलंगा तालुक्यातील वडगाव येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, "प्रत्येक निवडणुकीतील डाव वेगळा असतो. मुस्लिम समाजाने लोकसभेला जे केलं ते विधानसभेत नक्कीच करणार नाहीत. प्रत्येक निवडणुकीतील डाव वेगळा असतो. लोकसभा निवडणुकीत निलंगा मतदारसंघातून भाजपला कमी मतदान पडले.
काँग्रेसला इथे 20 हजाराची लीड मिळाली होती. पण विधानसभेला तसं होणार नाही. लातूरच्या राजकारणावर निलंगा विधानसभा मतदारसंघांचे कायम वर्चस्व राहिलं आहे." तर लोकसभेला भाजपला कमी मतदान झालं म्हणून लातूरचे लोक विधानसभेला मला आव्हान देत आहेत, असा टोला त्यांनी अमित देशमुखांना लगावला. तसेच आता ही लढाई अनेक वर्षापासून लातूर विरुद्ध निलंगा अशीच चालत आली असून ही लढाई आता वर्चस्वाची झाली असल्याचंही ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.