Parbhani LokSabha Constituency | Sanjay Jadhav Sarkarnama
मराठवाडा

Parbhani Loksabha Constituency : ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव शड्डू ठोकून मैदानात, पण...

Prasad Shivaji Joshi

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र असे असताना महायुतीचे जागावाटप अद्याप जाहीर झालेले नाही. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या परभणी लोकसभा मतदार संघासाठी महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय जाधव यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र महायुतीच्या उमेदवाराबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराबाबत आता सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार संजय जाधव हे ठाकरे गटाकडे असल्याने महाविकास आघाडीकडून त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीच्या प्रवेशाने जागावाटपाचे कोडे अद्याप सुटलेले नाही. नुकत्याच जिंतूर येथे झालेल्या विकासकामाच्या उद्घाटनप्रसंगी खासदार संजय जाधव यांनी शक्तीप्रदर्शन केले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

12 रोजी मानवत येथे विकासकामाच्या उद्घाटननिमित्त महाविकास आघाडीने मोठे शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे. जाधव यांच्या उमेदवारीच्या घोषणेची केवळ औपचारिकता बाकी असल्याने त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. पाथरी विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर यांचे आणि जाधव यांचे स्नेहपूर्ण संबंध आहेत. परभणी विधानसभा मतदारसंघातील आमदार राहुल पाटील हे ठाकरे गटात असल्याने या तीनही ठिकाणी जाधव यांची बाजू भक्कम आहे.

गंगाखेड मतदारसंघातील आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याशी मात्र त्यांचे अलीकडच्या काळात राजकीय मतभेद निर्माण झाले आहेत. महायुतीचा उमेदवार कोण असेल याकडे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांचे लक्ष लागलेच आहे. परंतु त्यापेक्षा महाविकास आघाडीच्या नेत्यांचे अधिक लक्ष लागले आहे. परभणी लोकसभा मतदारसंघ आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच आहे.

गंगाखेड मतदारसंघातील आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याशी मात्र त्यांचे अलीकडच्या काळात राजकीय मतभेद निर्माण झाले आहेत. महायुतीचा उमेदवार कोण असेल याकडे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांचे लक्ष लागलेच आहे. परंतु त्यापेक्षा महाविकास आघाडीच्या नेत्यांचे अधिक लक्ष लागले आहे. परभणी लोकसभा मतदारसंघ आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच आहे.

2019च्या लोकसभा निवडणूकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. पालकमंत्री नियुक्ती, जिल्हा नियोजन समिती सदस्य नियुक्तीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस वरचढ ठरली आहे. दुसरीकडे भाजपने युद्धपातळीवर तयारी सुरु केली आहे. गाव चलो अभियानाच्या निमित्ताने कार्यकर्ते व नेते गावोगावी फिरत आहेत.

पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात जिंतूर विधानसभेच्या आमदार मेघना बोर्डीकर यांचे नाव आघाडीवर आहे. तसेच महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनीही परभणी लोकसभा मतदारसंघावर दावा केल्याने महायुतीच्या उमेदवाराबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. उमेदवार कोणीही असला तरी निवडणुक चिन्ह कमळच असेल, असे भाजपचे कार्यकर्ते सांगत आहेत. महाविकास आघाडीकडून जाधव हे जवळपास निश्चित असले तरी प्रतिस्पर्धी कोण ? हे जाणून घेण्यासाठी ते स्वत: आणि कार्यकर्तेही उत्सुक आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT