Pratap Patil Chikhlikar-Ajit Pawar-Ashok Chavan News Sarkarnama
मराठवाडा

Pratap Patil Chikhlikar News : बरं झालं लोकसभेला हरलो.. नाहीतर अजित पवारांच्या नेतृत्वात काम करता आले नसते!

Pratap Patil Chikhlikar says losing the Lok Sabha election was a good outcome as he wouldn't have been able to work under Ajit Pawar's leadership, taking a sharp dig at Ashok Chavan. ज्यांना लोकसभेला हरवलं ते पक्षात आले अन् मी हरलो. त्यांच्यामुळे हरलो असं म्हणणार नाही, पण लोकांना ते आवडलं नाही.

Jagdish Pansare

Nanded Political News : माझ्या नशिबात कायम संघर्षच लिहिलेला आहे. मी आणि अजितदादा गाडीत येत असताना त्यांना मी लोकसभेला का हरलो? याचं उदाहरण पटवून देत होतो. ज्यांना पराभूत करून मी खासदार झालो, ते पक्षात आल्यानंतर मी पराभूत झालो, असे म्हणत आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पुन्हा एकदा अशोक चव्हाण यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला.

त्यांच्यामुळे माझा पराभव झाला असे मला म्हणायचे नाही, पण लोकांना ते पटले नाही. पण बरं झालं लोकसभेला हरलो, नाहीतर तुमच्या सारख्या नेतृत्वात काम करता आले नसते, असेही चिखलीकर म्हणाले. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्याच्या चव्हाणवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षप्रवेश सोहळ्यात प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांनी आपल्या भाषणातून भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांना चिमटा काढला.

ज्यांनी ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश (NCP) केला, त्या सगळ्यांचा योग्य सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही चिखलीकर यांनी दिली. मुखेड, कंधार या डोंगराळ भागात आमची सत्ता असताना, पद भोगताना आम्ही एकही उद्योग आणू शकलो नाही, अशी जाहीर कबुलीही चिखलीकर यांनी यावेळी दिली. माझा संघर्ष कोणाशी हे सगळ्यांना माहित आहे. ज्यांना लोकसभेला हरवलं ते पक्षात आले अन् मी हरलो. त्यांच्यामुळे हरलो असं म्हणणार नाही, पण लोकांना ते आवडलं नाही.

खासदार असताना मी लेंडी प्रकल्पाला निधी केंद्राकडून मिळावा यासाठी प्रयत्न केला, पण मला यश आलं नाही. 39 वर्ष रखडलेला लेंडी प्रकल्प अजितदादांमुळे आता सुरू होतोय. उदगीर-देगलूर रस्ता नितीन गडकरी यांच्याकडून मंजूर करवून घेतला. बोधन-मुखेड रेल्वेसाठी प्रयत्न केले. खासदार असताना पाच वर्षात अनेक प्रकल्प मार्गी लावले. हा भाग डोंगराळ आहे, माझी विनंती आहे, सत्तेत असताना आम्ही एक प्रकल्प उभा करू शकलो नाही.

पण तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत. एखादा प्रकल्प या भागात आणा आणि इथल्या तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून द्या, अशी मागणी चिखलीकर यांनी अजित पवार यांच्याकडे केली. पाच लाख सभासद नोंदणीचे टार्गेट आम्ही पूर्ण करू, असा विश्वास चिखलीकर यांनी यावेळी दिला. आपला पक्ष नांदेड जिल्ह्यात नंबर एकचा करू, असेही चिखलीकर म्हणाले. राष्ट्रवादीत जे जे प्रवेश करतायेत, त्यांना सन्मान देण्याचे काम करेल, असेही त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT