Mahadev Jankar Sharad Pawar Uddhav Thackeray sarkarnama
मराठवाडा

Mahadev jankar News : लढले महायुतीकडून पण महादेव जानकर म्हणतात, 'लोकांची सहानुभूती पवार-ठाकरेंना ...'

Sharad Pawar : बीड आणि परभणीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद झाला. या वादाला महाविकास आघाडीने खतपाणी घातले, असे महादेव जानकर यांनी म्हटले.

Roshan More

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अजून पंधरा दिवस शिल्लक आहेत. मात्र, महाराष्ट्रात महाविकास आघाडी की महायुती कोण जास्त जागा जिंकणार याची चर्चा होत आहे. या चर्चेमध्ये महायुतीचे परभणीतील उमेदवार, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मोठा दावा केला आहे. छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांच्या नंतर जानकर यांनी देखील या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सहानुभूती होती, असे म्हटले आहे.

महादेव जानकर Mahadev Jankar म्हणाले, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना लोकांची सहानुभूती होती. मात्र,तरीसुद्धा महायुती तब्बल 42 जागा जिंकेल. मी राज्यात 55 सभा घेतल्या मला दिसून आले लोकांची सहानुभूती ठाकरे आणि पवार यांच्यासोबत आहे. मात्र, महायुतीच जिंकले. बारामतीमधून सुनेत्रा पवार, बीडमधून पंकजा मुंडे Pankaja Munde आणि परभणीमधून मीच जिंकणार, असा आत्मविश्वास देखील जानकर यांनी बोलून दाखवला.

ओबीसी-मराठा वादाला खतपाणी

बीड आणि परभणीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद झाला. या वादाला महाविकास आघाडीने खतपाणी घातले, असे म्हणत मनोज जरांगे यांचे नाव न घेता याला तोच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप देखील महादेव जानकर यांनी केला. बीड आणि परभणीत सर्वाधिक कोण फिरले हे पाहायला हवे, असे देखील जानकर यांनी म्हणत जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला.

संजय जाधव अन् जानकर एकत्र!

परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे महादेव जानकर आणि ठाकरे गटाचे संजय जाधव यांच्यात तुल्यबळ लढत झाले. या लढतीमध्ये दोघांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. मात्र, एकमेकांविरोधात दंड थोपटलेले जानकर-जाधव एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. परभणीतील पोखरणी येथे पार पडलेल्या नरसिंह जन्मोत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमात हे दोन्ही उमेदवार एकत्र आले होते. विशेष म्हणजे दोन्ही नेते नरसिंह जन्मोत्सवाचे कीर्तन संपेपर्यंत एकमेकांसमोर बसून होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT