Mahadev Munde Murder Case News Beed Sarkarnama
मराठवाडा

Mahadev Munde News : बाळा बांगरने केलेल्या दाव्याला बळ! महादेव मुंडेंच्या मानेवर खोल जखम असल्याचा पोस्टमार्टममध्येही उल्लेख

The postmortem report of Mahadev Munde confirms a deep neck injury : गोट्या गित्तेने पिशवीमध्ये महादेव मुंडे यांच्या गळ्याच्या मासाचा तुकडा पुरावा म्हणून वाल्मीक कराडच्या टेबलवर मांडला होता, असा धक्कादायक खुलासा केला बाळा बांगर याने पत्रकार परिषदेत केला होता.

Jagdish Pansare

Beed Crime News : परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची दिड वर्षांपूर्वी परळीतील चौकामध्ये धारदार शास्त्राने हत्या करण्यात आली. सोळा महिने उलटून गेले तरी या हत्या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. आरोपींच्या अटकेवरुन आरोप - प्रत्यारोप सुरू आहेत. तर महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्‍वरी मुंडे यांनी विष प्राशन करत न्याय मिळत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला.

दरम्यान, महादेव मुंडे यांच्या खुनाबाबत विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी केलेल्या दाव्याला महादेव मुंडे यांच्या उत्तरीय तपासणी अहवालामुळे बळ मिळाले आहे. (Walmik Karad) या अहवालात देखील महादेव मुंडे यांच्या मानेवर डिप इंन्जूरी (खोलवर जखम) असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची निर्घुण हत्या करण्यात आली. तहसिल कार्यालयाजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला.

परळी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला. मात्र, अद्यापही या प्रकरणात एकही आरोपीला अटक झालेली नाही. (Beed Crime) दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर या प्रकरणालाही वाचा फुटली. आमदार सुरेश धस, खासदार सुप्रिया सुळे, बजरंग सोनवणे, आमदार प्रकाश सोळंके यांनी हा मुद्दा लावून धरला. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्‍वरी मुंडे यांच्यासह त्यांच्या कुटूंबियांनी आरोपींच्या अटकेसाठी आंदोलनही केले.

मागच्याच आठवड्यात ज्ञानेश्‍वरी मुंडे यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयातून बाहेर पडताना विषही प्राशन केले. आतापर्यंत या प्रकरणात आठ तपास अधिकारी बदलले आहेत. दरम्यान, आपण आणि वाल्मिक कराड बसलेलो असताना गोट्या गित्तेने पिशवीमध्ये महादेव मुंडे यांच्या गळ्याच्या मासाचा तुकडा पुरावा म्हणून वाल्मीक कराडच्या टेबलवर मांडला होता, असा धक्कादायक खुलासा केला बाळा बांगर याने पत्रकार परिषदेत केला होता. गोट्या गित्ते सायको किलर असल्याचाही आरोप त्यांनी केला होता.

याबाबत त्यांनी तत्कालिन तपास अधिकारी कमलेश मिना यांच्याकडे जबाबही नोंदवला. तसेच, या प्रकरणात वाल्मीक कराडला पोलिस कोठडी मागून त्याची व आपली क्रॉस चौकशी करावी, अशी मागणीही केली होती. आता बांगर यांच्या मानेच्या तुकड्याबाबतच्या दाव्याला पुष्टी मिळाली आहे. महादेव मुंडे यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात झाली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरीय तपासणीच्या अहवालात मुंडेंच्या मानेवर 8 बाय 4 बाय दोन सेंटीमिटर आकाराची खोल जखम असल्याचे नमूद आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT