Sharad Pawar sarkarnama
मराठवाडा

Sharad Pawar : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यासाठी तिघांचे प्रयत्न', शरद पवार परळीतून कडाडले

Sharad Pawar Criticized Dhananjay Munde : सत्ता ही जनतेचे कामकाज करण्यासाठी असते. पण इथल्या नेत्याच्या डोक्यात सत्ता गेल्याने त्यांनी आम्हाला धोका दिला. परळीतील आणि जिल्ह्यातील नागरिकांचे काम करण्याऐवजी त्रास देण्यास सुरुवात केली, असे शरद पवार म्हणाले.

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar News : परळी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यासाठी शरद पवारांना सभा घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यासाठी तिघांचे प्रमुख प्रयत्न होते. त्यांची नावे सांगण्याची आवश्यकता नाही. ते तुम्हाला माहीत आहे, असे म्हणत नाव न घेता धनंजय मुंडेंवर शरद पवारांनी जोरदार हल्ला केला.

शरद पवार Sharad Pawar म्हणाले की, पंडितअण्णा मुंडे हे माझ्याकडे आले होते. त्यांनी मला त्यांच्या मुलाला संधी देण्याची विनंती केली. आम्ही ती मान्य करत विरोधीपक्षनेते, आमदार, मंत्रिमंडळात संधी देत जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली.

सत्ता ही जनतेचे कामकाज करण्यासाठी असते. पण इथल्या नेत्याच्या डोक्यात सत्ता गेल्याने त्यांनी आम्हाला धोका दिला. परळीतील आणि जिल्ह्यातील नागरिकांचे काम करण्याऐवजी त्रास देण्यास सुरुवात केली. इथे दहशत निर्माण केली. व्यापाऱ्यांना व्यापार करता येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचे काम केले, असे नाव न घेता धनंजय मुंडे Dhananjay Munde यांच्यावर शरद पवारांनी टीका केली.

एकेकाळी या जिल्ह्याने सर्व आमदार निवडून देण्याचे काम केले, दिवंगत रघुनाथ मुंडे, माजी नगराध्यक्षा राधाबाई बियाणी यांनी इथे विकासाची कामे केली. आता आम्ही या मतदारसंघात परिवर्तन आणण्यासाठी राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली असून त्यांना संधी द्या असे आवाहन शरद पवारांनी केले.

सत्ता आल्यानंतर हवा डोक्यात गेली

परळीला काय झालं मला कळत नाही. परळीमध्ये गुंडगिरी वाढली. दुकानदारांची पत्र मला येतात. त्यांना धंदा करणं अवघड झालं आहे. इथल्या धंद्यांचे नियंत्रण त्यांना त्यांच्या हातात हवं. व्यापारी घटक अडचणीत आला आहे. हे चित्र बदलण्याशिवाय गत्यंतर नाही, असे शरद पवार म्हणाले.

सत्ता आल्यानंतर जमीनीवर पाय ठेऊन काम करायचे असते. मात्र, सत्ता यांच्या डोक्यात गेली. लोकांच्या अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नामागे कोण आहे हे लोक सांगायला तयार आहेत. हे थांबावायचे असेल तर एकत्रित येयला हवे, असे म्हणत पवारांनी धनंजय मुंडेंवर टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT