Local Body Election And Political Party Claim News Sarkarnama
मराठवाडा

Marathwada Local Body Election : राज्याच्या तिजोरीवर नेत्यांची दावेदारी अन् निधीची कोटीच्या कोटी उड्डाणे!

Marathwada Mahayuti Local Body Election : अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप हे तीन पक्ष अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढत आहेत.

Jagdish Pansare

  • राज्याच्या तिजोरीवर दावेदारी आणि कोट्यावधी निधी देण्याच्या आश्वासनांनी राजकीय वातावरण तापले आहे.

  • निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचल्याने सर्व पक्ष आपल्या ताबडतोब निर्णयांसाठी कोटींचा खेळ करत असल्याचे विरोधकांचे आरोप आहेत.

  • पैशाच्या जोरावर मतदारांवर प्रभाव निर्माण करण्याचा आरोप-प्रत्यारोपाचा दौर सुरु आहे.

Nagar Palika-Nagar Panchayat : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतदारांना आश्वासन देताना सत्ताधारी पक्षांकडून निधीची मोठमोठी आश्वासने दिली जात आहेत. महायुतीतील तीनही पक्षांमध्ये सध्या तिजोरीची मालकी कोणाकडे? यावरून स्पर्धा लागली आहे. राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजित पवार आपल्या भाषणातून माझ्याकडे तिजोरीच्या चाव्या आहेत, निधीची चिंता करू नका सांगत आहेत. तर नगरपालिका, नगर पंचायती या नगरविकास खात्या अंतर्गत येत असल्याने हे खात आमच्याकडे आहे, पाहिजे तितका निधी आणू असा दावा शिवसेनेकडून केला जातोय.

आता महायुतीतील या दोन पक्षांनी राज्याच्या तिजोरीवर दावा केल्यावर मुख्यमंत्री पद असलेल्या भाजपकडून यावर उत्तर आले नाही तर नवलच. तिजोरीच्या चाव्या जरी अजित पवारांकडे असल्या तरी सगळे अधिकार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, असे सागंत भाजपचे नेते मित्र पक्षांवर पलटवार करताना दिसत आहेत. मराठवाड्यासह राज्यात नगरपालिका, नगरपंचायतीचा प्रचार अंतिम टप्यात आला आहे. चोवीस ते तीस तासांचा प्रचार शिल्लक असल्याने सगळेच राजकीय पक्ष मतदारांवर आश्वासनांचा अक्षरशः पाऊस पाडत आहेत.

नगरविकास खाते आपल्याकडे-सावंत

अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप हे तीन पक्ष अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. तर महाविकास आघाडीमध्येही फाटाफूट झाली असून अनेक भागात त्यांनी चक्क सत्ताधारी पक्षांशी युती केल्याचे दिसून आले आहे. धाराशीव जिल्ह्यातील परांडा नगरपालिकेच्या एका प्रचार सभेत आमदार तानाजी सावंत यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये परांडा नगर पालिकेतील वीस अधिक एक असे सगळे उमेदवार निवडून आले पाहिजेत, अन्यथा मी विजयाचा गुलाल लावणार नाही.

निधीची चिंता करू नका, नगरविकास खाते आपल्या नेत्याकडे आहे, पाहिजे तितका निधी आणण्याची जबाबदारी माझी. तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडा, वीस अधिक एक अशा सगळ्यांना गुलाल लागला पाहिजे. निधी आणण्यात कमी पडलो तर मी आमदारकीचा राजीनामा देईन, असे विधान सावंत यांनी उत्साहाच्या भरात केले. तिकडे गंगाखेडमध्ये परळीचे आमदार धनंजय मुंडे हे आपल्या बहीणीच्या प्रचारात व्यस्त आहेत. मी याआधी इथे तीनवेळा आलो, पण तुम्ही मला निराश केले. आता पुन्हा हात जोडून विनंती करतो.

आम्ही सत्तेत, तिजोरीही आमच्याकडे-मुंडे

मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे, माझा पक्ष सत्ते आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आहेत. त्यांच्या हातात तिजोरी आहे, निधी आणण्याची जबाबदारी माझी आहे, असे म्हणत विरोधकांवर धनंजय मुंडे यांनी निशाणा साधला. बहिणीला निवडून दिलं तर परळीचा विजय गंगाखेडमध्ये येऊन साजरा करीन, असंही मुंडे म्हणाले. एकीकडे राज्याच्या तिजोरीची नेत्यांकडून विभागणी सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी ही या निवडणुकीत नवा पॅटर्न आणला. थेट संबंधित मंत्र्यांना फोन लावून आॅन दी स्पाॅट कामे मंजूर करण्याची त्यांची स्टाईल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

5 FAQs (Marathi)

1. सध्या वादाचा मुख्य मुद्दा काय आहे?
राज्याच्या तिजोरीतील निधीच्या वापरावरून राजकीय वाद पेटला आहे.

2. कोट्यावधी निधी उधळण्याचा आरोप कोणावर आहे?
विविध राजकीय पक्ष व नेते एकमेकांवर आरोप करत आहेत.

3. निवडणूक प्रचार कोणत्या टप्प्यात आहे?
प्रचार अंतिम टप्प्यात आहे.

4. या प्रकरणाचा मतदारांवर काय परिणाम होऊ शकतो?
मतदारांची दिशाभूल किंवा भावनिक प्रभाव निर्माण करण्याचा धोका वाढतो.

5. पुढे काय होऊ शकते?
निधी वापराच्या तपासणीची मागणी व राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT