Maharashtra Politics Sarkarnama
मराठवाडा

Maharashtra Politics: मंत्रिपद गेलं तरीही सरकारी बडदास्त सुरूच ; नेत्याचा रुबाबच लय भारी!

Mangesh Mahale

लोकसभा निवडणुकीनंतर मंत्रीपद गेले तरीही पोलिस सुरक्षेची बडदास्त तशीच आहे. मंत्री नसताना इतकी बडदास्त कशाला असा एक प्रश्न ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. सरकारकडून या नेत्यांच्या सुरक्षेसाठी होणाऱ्या पैशांच्या उधळपट्टीवर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी मंत्री म्हणून जशी खासदारांची पोलिस सुरक्षेची बडदास्त होती, तशी मंत्रिपद गेल्यानंतरही तशीच असल्याचे राज्यात दिसते. मराठवाड्यात दोन केंद्रीय मंत्री आणि एक सरकारमधील मंत्री यांचे मंत्रिपद लोकसभेनंतर गेले. त्यातील एकाने मंत्रीपद गेले तरीही सुरक्षा व्यवस्था तशीच ठेवली आहे, यावर राऊतांनी सडकून टीका केली आहे.

मराठवाड्यात दोन केंद्रीय मंत्री आणि एक सरकारमधील मंत्री यांचे मंत्रिपद जाऊनही आणि आता केवळ खासदार राहिले तरीही त्यांची Y दर्जाच्या पोलीस बंदोबस्ताची सरकारी बडदास्त सुरूच आहे.

लोकसभा निवडणुकीत केंद्रामध्ये मंत्री असलेले रावसाहेब दानवे (Raosaheb Danve), भारती पवार पराभूत झाल्यामुळे त्यांचे मंत्रिपद गेले. लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय अर्थराज्यमंत्री म्हणून असलेले डॉ. भागवत कराड (Bhagvat Karad) यांचेही लोकसभा निवडणुकीनंतर मंत्रीपद गेले आहे.

कराड यांची पोलिस सुरक्षा मात्र अद्यापही कायम आहे. मंत्रिपद जाऊनही तुम्हाला सरकारी सुरक्षा कशी मिळते, असा प्रश्न भागवतराव कराड यांना विचारण्यात आला. त्यावर भागवतराव कराड यांनी हसतहसत, मला माहिती नाही, असे उत्तर दिले. मला काहीच माहिती नाही. माझ्या सुरक्षेसाठी एक गाडी आहे, असे सांगत त्यांनी अधिक बोलणं टाळलं.

एका मंत्र्यांसाठी आणि आता खासदार असलेल्या व्यक्तीसाठी महिन्याला जवळपास दहा लाखाचा खर्च पोलिस विभागाला येतो. दुसरीकडे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण ही वाढतोय. कारण वाय दर्जाच्या सुरक्षेसाठी एक अधिकारी आणि तीन कर्मचारी असतात. त्याशिवाय जिथे त्यांचे ऑफिस आहे, त्या ठिकाणी तितकेच अधिकारी कर्मचारी तैनात असतात. सोबत फिरताना दोन पोलिसांची वाहने असतात. एक एस्कॉट टीम असते त्यात पीएसआय आणि तीन कर्मचारी असतात. ही सगळी बडदास्त पाहता किमान ३० जणांचा पोलिस बंदोबस्त दिवसभरात अतो. मग मंत्री नसताना इतकी बंदोबस्त कशाला असा एक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

राज्यातील केंद्रात मंत्री राहिलेले रावसाहेब दानवे, भागवत कराड , भारती पवार आजही वाय दर्जाच्या सेक्युरिटीमध्ये सरकारी बंदोबस्तात फिरतात.महायुतीमध्ये रोहियो मंत्री असलेले संदिपान भुमरे हे खासदार झाले त्यांचे राज्यातील मंत्रीपद गेलं, सरकारी गाडी गेली. मात्र, त्यांचा सरकारी बंदोबस्त मात्र अजूनही कायम आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT