Ambadas Danve Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve News: दगाबाज सरकार! महायुतीवर दानवे कडाडले; शेतकऱ्यांबाबतचा कळवळा किती खरा?

Ambadas Danve Slams Devendra Fadnavis:राज्यातील महायुती सरकार काय किंवा केंद्रातील मोदी सरकार काय दोघेही दोघेही फक्त तोंडाच्या वाफा गमवतात. 32 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केल्याचे श्रेय घेणाऱ्या सरकारकडून अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्णपणे मदतीचे अनुदान जमा झालेले नाही.

Jagdish Pansare

Shivsena UBT News: अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी इतिहासातील सर्वात मोठे पॅकेज जाहीर केल्याचा दावा महायुती सरकारने केला होता.

यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मराठवाड्यात दगाबाज सरकार म्हणत त्यांना जाब विचारला होता. आता संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी केंद्राकडे निधीची मागणी करणारा प्रस्तावच पाठवला नसल्याचे केंद्रीय कृषिमंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट केले.

त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या महायुती सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी यावर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये पुन्हा एकदा सरकार दगाबाज असल्याचा आरोप केला.

इतिहासातील सर्वात मोठे पॅकेज जाहीर केल्याचे राणा भीमादेवी थाटात सांगणाऱ्या सरकारची यानिमित्ताने पोलखोल झाली आहे. पॅकेजच्या नावाखाली कोट्यावधींचे आकडे तोंडावर फेकायचे आणि प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पाच ते दहा टक्केच रक्कम जमा करायची, हा प्रकार सातत्याने सरकारकडून सुरू आहे.

मराठवाड्यात आम्ही जेव्हा दौरे केले तेव्हा सरकारची ही चालाखी लक्षात आली होती. म्हणूनच आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या दगाबाज सरकारला जाब विचारला होता. केंद्र सरकारमधील कृषिमंत्र्यांनीच संसदेच्या अधिवेशनात महाराष्ट्र सरकारकडून अतिवृष्टी आणि महापुराच्या अनुदानासाठी निधी मिळावा,असा कुठलाही प्रस्ताव आपल्याकडे आलेला नाही. तरी देखील तातडीची मदत म्हणून केंद्राने तीन हजार कोटी रुपये महाराष्ट्र सरकारला दिले असल्याचे शिवराजसिंह चौहान यांनी आपल्या उत्तरात सांगितले.

महाराष्ट्र सरकारचा शेतकऱ्यांबद्दल असलेला कळवळा किती खरा आहे? हे यावरून स्पष्ट होते. केंद्र आणि राज्यातील सत्तेचा हवाला देत आमचे सरकार हे डबल इंजिनचे असल्याचा दावा किती पोकळ आहे हेही या निमित्ताने समोर आले आहे. राज्यातील महायुती सरकार काय किंवा केंद्रातील मोदी सरकार काय दोघेही दोघेही फक्त तोंडाच्या वाफा गमवतात. इतिहासातील सर्वात मोठे 32 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केल्याचे श्रेय घेणाऱ्या सरकारकडून अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्णपणे मदतीचे अनुदान जमा झालेले नाही.

या निमित्ताने मला केंद्र सरकारलाही विचारायचे आहे, की जेव्हा गुजरातमध्ये पूर आणि अतिवृष्टीने नुकसान झाले होते तेव्हा केंद्राचे पथक तिथे महिनाभर जाऊन बसले होते. ज्या तत्परतेने गुजरातमधील शेतकरी आणि सर्वसामान्यांना केंद्राने मदत केली, तीच तत्परता त्यांनी महाराष्ट्रात का दाखवली नाही? एक तर केंद्राचे पथक महाराष्ट्रात उशिराने दाखल झाले आणि अवघ्या एक-दोन दिवसात त्यांनी संपूर्ण राज्यातील नुकसानाची पाहणी केल्याचा आव आणला. काही ठिकाणी तर बॅटरीच्या उजेडात पाहणी करून या पथकाने धूम ठोकली.

त्यामुळे राज्य सरकारने केंद्राकडे मदतीसाठी प्रस्तावच पाठवला नाही याबद्दल आश्चर्य वाटत नाही. प्रस्ताव पाठवला नाही म्हणून केंद्र सरकार किंवा त्यांचे कृषिमंत्री हात झटकू शकत नाहीत. ज्या तत्परतेने गुजरात व इतर राज्यांना संकटाच्या काळात मदत करता, तीच तत्परता केंद्राने महाराष्ट्राच्या बाबतीतही दाखवायला हवी होती, अशा शब्दात अंबादास दानवे यांनी केंद्र सरकारवरही टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT