Devendra Fadnavis Suresh Dhas sarkarnama
मराठवाडा

Maharashtra Politics : 'सुरेश धस मागे लागले की डोकं खाऊन टाकतात...', CM देवेंद्र फडणवीस काय नेमकं काय म्हणाले?

Devendra Fadnavis Praises MLA Suresh Dhas : मी जेव्हा मुख्यमंत्री झालो असे लक्षात आले की 23 टीएमसी पाणी कागदावर आहे. फक्त सात टीएमसी पाणी दिलं जातंय. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Roshan More

Maharashtra Politics : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा विषय सुरेश धस आक्रमक झाले आहेत. दोषींवर कारवाई करण्याची मागणी ते करत आहेत. या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस हे पहिल्यांदाच आज (बुधवारी) बीड जिल्ह्यात आले होते. त्यांच्या हस्ते आष्टी येथील कुंटेफळ साठवण तलावाचे भूमिपूजन करण्यात आले.

फडणवीस यांनी सुरेश धस यांना आधुनिक भगिरथ म्हणत त्यांचे कौतुक केले. तसेच सुरेश धस मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर अगदी मागेच लागायचे. ते सातत्याने पाठपुरवठा करायचे. सुरेश धस मागे लागले की डोके खावून टाकतात., असे म्हटले.

'मराठवाड्याला कृष्णा खोरेचे पाणी मिळाले पाहिजे, यासाठी गोपीनाथ मुंडे आणि मराठवाड्याततील अनेक नेत्यांनी प्रयत्न केला. मराठवाड्यासाठी 23 टीएमसी पाणी देण्यात येते. मी जेव्हा मुख्यमंत्री झालो असे लक्षात आले की 23 टीएमसी पाणी कागदावर आहे. फक्त सात टीएमसी पाणी दिलं जातंय.', असे फडणवीस म्हणाले.

या भागातील दु्ष्काळ आता इतिहास होणार आहे. या प्रकल्पाला 11 हजार कोटींचा निधी दिला आहे. हे काम अंत्यत वेगाने चालले आहे. धारशिवमध्येही आणि आष्टी तालुक्यातही हे पाणी आपण आणणार आहोत. ज्या गतीने काम चालेले आहे संपूर्ण परिसर बागायती झालेला असेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नवीन बीड तयार करू...

सरपंच परिषदेचे लोक मला भेटले होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संतोष देशमुख निर्घूण खुनाची घटना आणि अशा घटना खपवून घेणार नाही. आपण सगळे छत्रपती शिवरायांचे मावळे आहे. शिवरायांनी मावळ्यांना एकत्रित करून स्वराजाची स्थापना केली. माझे बीडवासीयांना सांगणे आहे, आपल्याला सगळ्यांना एकत्रित नांदायचे आहे. नवीन बीड आपण तयार करू . मोठ मोठी लोक बीडने दिले आहे. तो इतिहास पुढे जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT