Shreejaya Chavan, Ashok chavan  Sarkarnama
मराठवाडा

Bhokar Assembly Election Result 2024 आजोबा, वडील, आई अन् मुलगी एकाच मतदारसंघातून विजयी ; चव्हाण कुंटुबियांचा असाही विक्रम

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भोकर विधानसभा मतदारसंघात श्रीजया चव्हाण यांच्या रुपाने चव्हाण कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील उमेदवार प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उभा असल्याने या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले होते. या मतदारसंघात चव्हाण कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Nanded News: राज्याचे लक्ष लागलेल्या भोकर विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण या विक्रमी मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार पप्पू पाटील कोंढेकर यांचा पराभव केला आहे. महाराष्ट्रच्या राजकारणात एकाच मतदारसंघातून आजोबा, वडील, आई व मुलगी निवडून येण्याचा विक्रम झाला आहे.

भोकर विधानसभा मतदारसंघातून दिवंगत नेते डॉ. शंकरराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी आमदार अमिता चव्हाण या निवडून आल्या आहेत व नांदेड जिल्ह्यातील हादगाव विधानसभा मतदारसंघतुन आई व मुलगी निवडून आल्या होत्या. राज्यात ज्या लक्षवेधी लढती झाल्या होत्या. त्यात भोकर विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर विधानसभेची ही पहिलीच निवडणूक होती, या मतदारसंघात त्यांचे गेल्या २५ वर्षांपासून वर्चस्व राहिले आहे.

भोकर विधानसभा मतदारसंघात श्रीजया चव्हाण यांच्या रुपाने चव्हाण कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील उमेदवार प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उभा असल्याने या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले होते. या मतदारसंघात चव्हाण कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे. या मतदारसंघात त्यांनी विकास केला असून या चांगली पकड आहे.

भोकर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार पप्पू पाटील कोंढेकर व महायुतीचे उमेदवार श्रीजया चव्हाण यांच्यात सरळ लढत झाली. महायुतीच्या प्रचाराची धुरा समर्थपणे माजी मुख्यमंत्री अशोक यांनी सांभाळली. प्रचाराचे सुक्ष्म नियोजन केले. त्यांनी विकास कामांचा आढावा जनतेसमोर मांडत विकासावर मतं मागितली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अशोक चव्हाण यांना टार्गेट करून घेरण्याचा प्रयत्न केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री अमित देशमुख यांनी सभा घेऊन वातावरण निर्मिती केली.

भोकर विधानसभा मतदारसंघात प्रथमच भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलेले आहे.जेव्हा मुदखेड विधानसभा मतदारसंघ होता तेव्हा आणिबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत दिवंगत नेते अॅड चंद्रकांत मस्की निवडून आले होते. भोकर विधानसभा मतदारसंघाच्या फेररचनेत अर्धापूर, मुदखेड व भोकर तालुक्याचा समावेश करण्यात आला. फेररचनेनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर भाजपाची ताकद वाढली व श्रीजया चव्हाण कमळाच्या चिन्हावर निवडूण आल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील हादगाव विधानसभा मतदारसंघतुन माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील व त्यांच्या आई निवडून आल्या होत्या. त्यांनंतर जिल्ह्याच्या व राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच आजोबा, वडील, आई व मुलगी एकाच मतदारसंघातून विजयी होण्याचा विक्रम भोकर विधानसभा मतदारसंघाने केला आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT