NCP Office  Sarkarnama
मराठवाडा

राष्ट्रवादी भवन अंधारात; लाखो रुपयांचे वीजबिल थकल्याने कनेक्शन कट!

राष्ट्रवादी भवन अंधारात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

सरकारनामा ब्युरो

बीड : जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) राजेश्वर चव्हाण (Rajeshwar Chavan) यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. ही निवड झालेली असताना आता एक महिन्यापासून बीडमधील राष्ट्रवादी भवन अंधारात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. लाखो रुपयांचे वीजबिल थकल्याने महावितरण (Mahavitaran) वीजजोडणी तोडली असून, काही महिन्यांपासून या भवनात कोणत्याही बैठका होत नसल्याचे समोर आले आहे.

मागील एक महिन्यापासून राष्ट्रवादी भवन अंधारात आहे. राष्ट्रवादी भवनात वीज नसल्याने एकही नेता तिकडे फिरकत नाहीत. लाखो रुपये खर्चून उभी केलेली इमारत आता शोभेची वस्तू बनली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मेळावे, शिबीरे आणि बैठका घेण्यासाठी टोलेजंग राष्ट्रवादी भवन बांधण्यात आले. मात्र, तेथे वीजच नसल्याने कार्यकर्ते आणि नेत्यांनी भवनकडे पाठ फिरवली आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि आमदार संदीप क्षीरसागर यांचा जनता दरबार राष्ट्रवादी भवनात होत असे. सुविधा नसल्याने त्यांनीही आता शासकीय विश्रामगृहाला पसंती दिली आहे. आता नवीन जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना राष्ट्रवादी भवनाकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

बीडमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध उर्वरित राष्ट्रवादी असे काहीसे चित्र आहे. त्या उर्वरित राष्ट्रवादीत जिल्हाध्यक्ष बदल हा देखील अजेंड्यावरील विषय होता. आमदार प्रकाश सोळंके व माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या विषयाला यश आले आणि राजेश्वर चव्हाण पक्षाचे जिल्हाध्यक्ष बनले. चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेसेचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू मानले जातात. विशेष म्हणजे विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसमधील पहिल्या व दुसऱ्या फळीतील मूळ राष्ट्रवादीतील असलेल्या मोजक्या नेत्यांपैकी राजेश्वर चव्हाण हे एक आहेत. २५ वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेचे सदस्य असल्यापासून त्यांची पवारांशी थेट ओळख आहे. त्यामुळे उर्वरित राष्ट्रवादी गोटाने राजेश्वर चव्हाण यांचे नाव जिल्हाध्यक्षपदासाठी पुढे केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT