Mahayuti Banner sarkarnama
मराठवाडा

Mahayuti Beed Rally : महायुतीचा बीडमध्ये कार्यकर्ता मेळावा अन् बॅनरवर गोपीनाथ मुंडेंचा फोटोच नाही!

Gopinath Munde : कार्यकर्त्यांची अन् प्रितम मुंडेंचीही नाराजी, जाणून घ्या काय म्हणाल्या आहेत?

Datta Deshmukh

Beed News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीने कंबर कसली आहे. याच अनुषंगाने जिल्हानिहाय महायुती मित्रपक्षांचे संमेलन आयोजित केले जात आहेत. अशाच प्रकारे बीडमध्ये सुद्धा संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, मात्र बॅनर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नव्हता, परिणामी मुंडे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. एवढच नाहीतर भाषणात खासदार प्रितम मुंडे यांनीही या मुद्द्याला अधोरेखित केले आणि असे प्रकार पुन्हा होणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आवाहनही केले.

दरम्यान, कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी व्यासपीठावरील मुख्य बॅनरच्या बाजूला दिवंगत गोपीनाथ मुंडे(Gopinath Munde) यांचा डिजीटल फोटो लावण्यात आला. महायुतीमध्ये वरचेवर मित्रपक्ष वाढत आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत सर्व नेते व पदाधिकारी यांच्यात सुसंवाद असावा यादृष्टीने महायुतीमधील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महायुतीमधील मित्रपक्षांचे जिल्हानिहाय संमेलने आयोजित करण्यात आली आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा

बीड जिल्ह्यात या संमेलनाच्या समन्वयाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्यावर सोपवली आहे. मागील आठ दिवसांपासून संमेलनाची तयारी सुरु आहे. संमेलनाचे मुख्य बॅनर राज्यपातळीवरून निश्चित झाले आहे. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, दिवंगत आनंद दिघे, दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे डाव्या बाजूला छायाचित्रे आहेत. तर, उजव्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi), भाजपध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच गृहमंत्री अमित शहा यांची छायाचित्रे आहेत.

तर, खालच्या भागात महायुतीतील घटकपक्ष असलेल्या रिपाइंचे अध्यक्ष व मंत्री रामदास आठवले(Ramdas Athawale), भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, शिवसंग्रामच्या प्रमुख डॉ. ज्योती मेटे, प्रहारचे बच्चू कडू, सुलेखा कुंभारे, जोगेंद्र कवाडे, सदाभाऊ खोत आदींची छायाचित्रे आहेत.

सदर बॅनर राज्यपातळीवरुनच पाठविल्याचे संयोजकांचे म्हणणे आहे. या बॅनरवर स्थानिक पातळीवर खालच्या बाजूला पालकमंत्री धनंजय मुंडे व भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची छायाचित्रे जोडण्यात आली.

दरम्यान, कार्यक्रमापूर्वी पदाधिकारी जमत असताना बॅनरवर दिवंगत मुंडेंचा फोटो नसल्याने भाजप पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, हे बॅनर राज्य पातळीवरुन आणि भाजपकडूनच निश्चित करुन आल्याचे संयोजकांनी सांगीतले. यानंतर दिवंगत मुंडेंचे डिजीटल छायाचित्र लावण्यात आले. भाषणात डॉ. प्रितम मुंडे यांनीही या मुद्द्यावर बोट ठेवले.

(Edited by- Mayur Ratanaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT