Majalgaon APMC Result News
Majalgaon APMC Result News Sarkarnama
मराठवाडा

Majalgaon APMC Result News : माजलगांव बाजार समितीत ११ जागा जिंकत राष्ट्रवादीची सत्ता...

सरकारनामा ब्युरो

Beed News : माजलागाव बाजार समिती निवडणुकीत (Majalgaon APMC Result News) राष्ट्रवादीने सर्वाधिक ११ जागा जिंकत सत्ता मिळवली. वडवणी बाजार समितीत राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने सर्वच्या सर्व १८ जागा निवडून आणल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या माजलगाव मतदारसंघातील बाजार समितीच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

सोळुंके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने (Ncp) इथे अकरा जागा जिंकत वर्चस्व प्रस्थापित केले. भाजपला फक्त तीन जागांवर समाधान मानावे लागले. तर चार अपक्षांनी विजय मिळवत सगळ्यांनाच धक्का दिला. बीड जिल्ह्यात सर्वाधिक उत्पन्न असणारी दुसऱ्या क्रमांकाची बाजार समिती म्हणून माजलगाव बाजार समिती ओळखली जाते.

आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. १८ पैकी ११ जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. (Beed) तर ३ जागा भाजपच्या वाट्याला आल्या. अपक्षांनी अनपेक्षितपणे चार जागांवर विजय मिळवला.

जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, हमाल, मापाडी अन व्यापाऱ्यांचा कल राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. बीड जिल्ह्यातील केज वगळता, अंबाजोगाई, परळी, बीड, गेवराई, वडवणी आणि आता माजलगांव बाजार समितीत देखील राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे.

काही ठिकाणी महाविकास आघाडी असली तरी त्यात देखील वर्चस्व राष्ट्रवादीचेच असल्याचे पहायला मिळाले होते. आमदार प्रकाश सोळंके, धनंजय मुंडे, माजी आमदार अमरसिंह पंडीत या जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपापल्या बाजार समित्या राखत वर्चस्व सिद्ध केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT