Majalgaon Assembly Constituency sarkarnama
मराठवाडा

Majalgaon Assembly Constituency : कनेक्टीव्हीटी, सहानुभूती आणि विश्‍वासहार्यतेमुळे मातब्बरांची साथ; म्हणून बनला माजलगावमध्ये आडसकरांचा माहोल

माजलगावमधून २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीच्या शब्दावर भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु, ऐनवेळी उमेदवारी टळली. तरीही मतदार संघात कनेक्टीव्हीटी ठेवली.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Assemly Election 2024 : माजलगावमधून २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीच्या शब्दावर भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु, ऐनवेळी उमेदवारी टळली. तरीही मतदार संघात कनेक्टीव्हीटी ठेवली. 2019 साली निवडणुकीतील पराभवाच्या तिसऱ्या दिवशी अतिवृष्टीने नुकसानीची पाहणी करत आपण पराभूत झालो असलो तरी हारलो नाहीत हे रमेशराव आडसकरांनी दाखवून दिले.

पाच वर्षे मतदार संघाची नाळ तुटू दिली नाही. नव्या महायुतीमुळे जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे गेल्याने पुन्हा उमेदवारीच्या शब्दावरच राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. मात्र, या पक्षाने भाजपच्या पदाधिकाऱ्याला उमेदवारी दिली. त्यामुळे सहानुभूतीची लाट निर्माण झाली. मतदार संघातील संपर्कातील सातत्य,

सर्वांशी दिलखुलास असल्याने माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील, माजी आमदार मोहनराव सोळंके आणि मुंबई बाजार समितीचे अध्यक्ष अशोक डक आदी मातब्बरांसह इतरही संघटनांचे पदाधिकारी आता अपक्ष रिंगणात असलेल्या रमेशराव आडसकर यांना साथ देत आहेत. त्यामुळे त्यांचा चांगलाच माहोल तयार झाला आहे.

विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्‍वासू असल्यानेच अशोक डक यांच्याकडे आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती मानल्या जाणाऱ्या मुंबई उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहे. मात्र, त्यांनीही पक्षाच्या उमेदवाराऐवजी आता रमेशराव आडसकर यांच्या पारड्यात वजन टाकल्याने मतदार संघात जायचा तो मेसेज गेला.

माजलगाव मतदार संघात राधाकृष्ण होके पाटील, मोहनराव सोळंके व अशोक डक यांच्या स्वतंत्र ताकदी आहेत. तरीही ही मंडळी कोण्या पक्षाच्या उमेदवारांऐवजी अपक्ष असलेल्या रमेशराव आडसकर यांच्या पाठीशी उभा राहील्याने मतदार संघात अनुकुल वातावरण झाले. अशी जेष्ठ आणि मातब्बर मंडळी मागे उभी राहील्याने सामान्य मतदारांत देखील विश्‍वासहार्यतेवर शिक्कामोर्तब झाले.

सतत उमेदवारी डावलल्याची सहानुभूती आणि पराभवानंतरही मतदार संघाची नाळ न तुटू दिल्याने कनेक्टीव्हीटीचा फायदा आडसकर यांना होताना दिसत आहे. जगदीश फरताडे, विजय साळवे, बालू जाधव, २० वर्षे सोळंके कुटूंबाशी एकनिष्ठ असलेले पप्पू सोळंके अशी टिम आडसकरांशी जोडली जात आहे.

रमेशराव आडसकर यांचा स्वभाव देखील सर्वांशी दिलखुलास, हसत खेळत आणि जे पोटात ते ओठात असणारा असाच आहे. ्रपसंग आणि ठिकाण कोणतेही असो मग आढेवेढे आणि मोठेपणा नाही. तसेच सर्व उमेदवारांच्या तुलनेने ‘स्पीड’असणारा माणूस अशी ओळख निर्माण झाल्याने तरुणांसह अबालवृद्धांतूनही त्यांना प्रतिसाद आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT