Manoj jarange rally News Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Family : मनोज जरांगेंच्या पाठीशी आईचा आशीर्वाद, सभेला उपस्थित...

Jagdish Pansare

Maratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून आंदोलनात उतरलेल्या मनोज जरांगे पाटील यांना त्यांच्या कुटुंबाचाही मोठा पाठिंबा आहे. (Maratha Rally) अंतरवाली सराटीसह आतापर्यंत जरांगे यांनी समाजासाठी केलेल्या ३५ पेक्षा जास्त आंदोलनात त्यांचे आई-वडील, पत्नी, मुलं त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. अंतरवाली सराटीतील लाखोंच्या उपस्थितीत झालेल्या सभेत मनोज जरांगे यांच्या मातोश्री उपस्थित होत्या.

सभास्थळी त्या दाखल झाल्या नंतर माझ्या लेकराला माझा आशीर्वाद असल्याचे त्यांनी सांगितले. (Maratha Reservation) अंतरवाली सराटीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जरांगे पाटील यांनी जेव्हा उपोषण सोडले होते, तेव्हा त्यांचे वडीलही तिथे उपस्थित होते. (Jalna) जरांगे यांच्यासोबतच त्यांनाही ज्यूस देऊन तुमचा मुलगा लढवय्या आहे, हट्टी आहे, असे कौतुक मुख्यमंत्र्यांनी केले होते. जरांगे यांच्या सतरा दिवसांच्या आंदोलनात त्यांची मुलं, आई-वडील, पत्नी सगळेच सहभागी झाले होते.

जरांगे यांची उपोषणामुळे प्रकृती बिघडली होती तेव्हा त्यांच्या वृद्ध आईची काळजी दिसून आली होती. डोळ्यांतील अश्रू सावरत तेव्हा त्यांनी मनोज जरांगे यांना धीर दिला होता. (Maharashtra) आईच्या डोळ्यांत पाणी पाहून जरांगे यांच्या संयमाचाही बांध फुटला होता आणि आईच्या कुशीत शिरून ते ढसाढसा रडले होते. कुटुंबीयांचा भक्कम पाठिंबा असल्यामुळेच मी मराठा आरक्षणाचा लढा उभारू शकलो, असे जरांगे यांनीही जाहीर भाषणातून सांगितले होते.

आई-वडिलांना मुलाचा अभिमान

मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी आपली शेती विकून मैदानात उतरलेल्या मनोज जरांगे यांचा अभिमान असल्याचे त्यांचे वयोवृद्ध आई-वडील मोठ्या अभिमानाने सांगतात. राज्यव्यापी दौऱ्यानंतर आज राज्य सरकारला निर्णयासाठी दिलेली महिनाभराची मुदत संपत आहे. या पार्श्वभूमीवर अंतरवालीत होणाऱ्या रेकाॅर्डब्रेक सभेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. अशावेळी आपला मुलगा समाजाला काय मार्गदर्शन करणार, हे ऐकण्यासाठी आणि जरांगे यांना आशीर्वाद देण्यासाठी सभास्थळी उपस्थित झाल्या होत्या.

राज्यात आतापर्यंत झालेल्या कुठल्याही सभा, मेळाव्याचे रेकाॅर्ड मोडणारी जरांगे पाटील यांची ही सभा ठरणार आहे. मैदान अपुरे पडले आहे, लोकांना सभेच्या ठिकाणी पोहाेचण्यासाठी दहा ते पंधरा किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. समाजासाठी या हे जरांगे यांनी केलेले आवाहन प्रत्येकाच्या मनाला साद घालून गेल्याचे चित्र अंतरवालीकडे निघालेल्या वाहनांची गर्दी आणि सभेच्या ठिकाणी भर उन्हात जणू मुंग्या चालत आहेत अशी लोकं डोक्यावर टोप्या, गमजे, महिला पदर घेऊन बसल्या आहेत. जरांगे यांचे सभास्थळी कोणत्याही क्षणी आगमन होईल. तेव्हा त्यांना पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीचा उत्साह शिगेला पोहाेचणार एवढे मात्र नक्की.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT