Jalna News: मनोज जरांगे यांनी सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी लावून धरली आहे. त्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालवल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे.
दोन दिवसात जरांगे यांचे उपोषण सोडवा, अन्यथा सकल मराठा समाज ( Maratha Reservation ) रस्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे. जरांगे (Manoj Jarage) यांची प्रकृती कालपासूनच (मंगळवार) खालावली असून त्यांना रात्री सलाईन लावली होती.
अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.सगेसोयरे कायद्यासह सर्व मागण्या मान्य करा, अन्यथा विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सर्वच उमेदवार पाडू, असा इशारा मनोज जरांगे यांनी काल दिला. शिंदे-फडणवीस-पवार सरकारने कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना दिले आहे.
"जोपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत सरकारवर विश्वास ठेवणार नाही. सगेसोयऱ्याच्या अंमलबाजवणीला 5 महिने वेळ लागतो का? हा प्रश्न तडीस नेतो, असं आश्वासन दिलं आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न तडीस नेणाऱ्या मंत्र्यांचं नाव उघड घेऊन कौतुक करणार," असं जरांगे-पाटलांनी सांगितलं.
जालना जिल्ह्याचे नवनिर्वाचित काँग्रेस खासदार खासदार कल्याण काळे यांनी काल जरांगेंची भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे आमदार तथा माजी मंत्री राजेश टोपेही यांनीही त्यांची भेट घेतली. मराठा आरक्षण आंदोलनमुळे लोकसभेत जालना, बीड येथे महायुतीचे उमेदवार पडल्याची चर्चा आहे.
जरांगे पाटलांच्या उपोषणावर सरकार गंभीर आहे. त्यांच्या मागण्यावर सरकार कार्यवाही करीत आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. मागे आम्ही त्यांना जे आश्वासन दिलं होतं, त्याप्रमाणे केसेस परत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, असेही ते म्हणाले आहेत. त्यांची मागणी आहे त्याबाबतदेखील सरकारने पहिला नोटिफिकेशन जारी केलं असून त्यावर कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती फडणवीसांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.