Antarwali Sarati_Shahaji Bapu Patil 
मराठवाडा

Shahaji Bapu: जरांगेंच्या भेटीसाठी आंतरवलीत पाठवला दूत! शहाजी बापू म्हणाले, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, एकनाथ शिंदे...

Shahaji Bapu at Antarwali Sarati : मराठा सामाजाला ओबीसीतून आरक्षणात अनेक अडचणी येत असल्यानं प्रमुख आंदोलक मनोज जरांगे यांनी आंतरवली सराटीत पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरु असल्यानं त्यांची प्रकृती बिघडली आहे.

Jagdish Pansare

Shahaji Bapu at Antarwali Sarati : मराठा सामाजाला ओबीसीतून आरक्षणात अनेक अडचणी येत असल्यानं प्रमुख आंदोलक मनोज जरांगे यांनी आंतरवली सराटीत पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरु असल्यानं त्यांची प्रकृती बिघडली आहे. यापार्श्वभूमीवर त्यांनी उपोषण सोडावं तसंच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला दूत त्यांच्याभेटीसाठी पाठवला आहे. हा दूत म्हणजेच शहाजी बापू पाटील आहेत. याठिकाणी भेट दिल्यानंतर शहाजीबापूंनी जरांगेंना शिंदेंचा संदेश देताना एक ग्वाहीही दिली आहे.

आंतरवलीत भेटीदरम्यान शहाजी बापू म्हणाले, "मराठा समाजाची अवस्था बिकट आहे. वाड्यातील पाटलीन कधी बाहेर दिसत नव्हती, ती आता शेतात खुरपायला जाते. शेकडो एकर जमीन असलेला मराठा समाज आता तीन-चार एकरवर आला आहे. संपूर्ण देशातील मराठा समाजाचे लक्ष अंतरवाली सराटी येथील या उपोषणाकडे लागले आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली आहे, त्यांचे डोळे खोल गेले आहेत. त्यांचे हे हाल पहावत नाहीत. माझी सरकारला विनंती आहे, त्यांनी तासाभरात निर्णय घ्यावा.

पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, एकनाथ शिंदे यांची मराठा समाजाविषयीची तळमळ प्रामाणिक आहे, असंही शहाजी बापू यावेळी म्हणाले. जरांगेंची खालावलेली प्रकृती पाहून शहाजी बापूंनी मंत्री शंभुराज देसाईंना तात्काळ फोनवरुन संपर्कही साधला. सरकारला जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्यास भाग पाडावे, अशी विनंती केली. यावेळी शहाजी बापू पाटील यांचे डोळे पाणावले होते. मराठा सामाजाच्या मागण्यांवर लवकरच निर्णय होईल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. गेल्यावेळच्या उपोषणालाही मी पाठिंबा दिला होता, आम्ही जरांगे पाटील यांच्यासोबत आहोत, असेही पाटील यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT