Jalna: हिवाळी अधिवेशन काल (20 डिसेंबर) संपल्यावर लगेचच आज (गुरुवारी) राज्य सरकारचे शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी जाणार आहे. मंत्री उदय सामंत, संदीपान भुमरे, गिरीश महाजन आणि अपक्ष आमदार बच्चू कडू आज दुपारी अंतरवली सराटी येथे जाऊन त्यांची भेट घेणार आहेत. आरक्षणासाठी मराठ्यांचा मोर्चा मुंबईत धडकण्याची शक्यता आहे. मुंबईला जाण्यासाठी ट्रॅक्टर देऊ नका, अशी नोटीस पोलिसांनी ट्रॅक्टर मालकांना बजावली आहे. यावर जरांगेंनी संताप व्यक्त केला आहे.
'नोटीस पाठवून आम्हाला चिथावणी देऊ नका. नोटीस काढून सरकार आंदोलकांमध्ये दरी निर्माण करीत आहे,' असे जरांगे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. 'आम्ही मुंबईला जायचं अद्याप ठरवलेलं नाही, मग सरकार नोटीस का देत आहेत. नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा',अशी मागणी जरांगे-पाटलांनी केली आहे.
मराठा मोर्चाची शक्यता असल्याने मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पोलिसांनी मुंबईत कलम 144 लागू केले आहे. यामुळे मुंबईकरांना कुठेही जमाव करता येणार नाही. मुंबई पोलिसांनी ही जमावबंदी मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लागू केल्याचे बोलले जात आहे.
मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे, यावर जरांगेची संताप व्यक्त केला आहे. रेल्वे स्थानक, मंत्र्यांचे बंगले, मंत्रालय परिसरात गर्दी जमल्यास त्याठिकाणी जमावबंदी लावणार का? असा सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी विधिमंडळात निवेदन दिल्यानंतर जरांगे-पाटील यांनी त्यावर तिखट प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांनी दिलेली फेब्रुवारीची डेडलाईन फेटाळून लावत जरांगे-पाटील यांनी 24 डिसेंबरच्या आत मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी भूमिका घेतली.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.