Manoj Jarange on Chhagan Bhujabal, Laxman Hake
Manoj Jarange on Chhagan Bhujabal, Laxman Hake Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange: भुजबळच हे सर्व घडवत आहेत; जरांगेंचा आरोप; धनगर, ओबीसी विरोधक नाहीत...

Mangesh Mahale

मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यातील विस्तव जाण्याचे नाव घेत नाही. संधी मिळताच दोन्हीही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असतात. ओबीसी नेते लक्ष्मण हाके हेही सध्या आक्रमक झाले आहेत. त्यामुळे राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असे चित्र सध्या दिसते आहे. जरांगे यांनी या आंदोलनाबाबत स्पष्टीकरण दिले.या आंदोलनामागे भुजबळ असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे.

छगन भुजबळ हे मुकादम आहेत. त्यांनी सर्वांना काम ठरवून दिले असून त्यानुसार काही लोक बोलत आहेत. आम्ही लक्ष्मण हाके यांना दोष देणार नाही. गाव खेड्यात आमचे बांधव आहेत, आमचे संबंध आहेत. आम्ही धनगर व ओबीसी नेत्याला विरोधक मानत नाहीत. केवळ छगन भुजबळ हे सर्व घडवून आणत आहेत," असा आरोप जरांगे यांनी केला.

"मला सर्व समाज सारखा आहे. मी समाजासाठी काम करतो. पालकमंत्री तुमचा असल्यामुळे मराठा समाजावर अन्याय करता का? माझ्या मराठा बांधवांना त्रास होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगतो माझ्या मराठ्यांना त्रास देऊ नका आमचा संयम ढळू देऊ नका," असे जरांगे म्हणाले.

"अंबडमध्ये मुद्दाम आंदोलन सुरू केले. त्यांना वाद घडवून आणायचे आहेत. उपोषण सुद्धा वडीगोद्रीमध्ये सुरू करायला लावले. छगन भुजबळ यांनी मातोरीमध्ये दगडफेक घडवून आणायला सांगितले. त्यांनीच त्यांच्या गाड्या फोडल्या. इथून पुढे माझ्या मराठा बांधवांनी त्रास होऊ नये हे काळजी फडणवीस यांनी घ्यावी," असे जरांगे म्हणाले.

स्वर्गीय विनायक मेटे यांचे स्वप्न असलेले शिवस्मारक पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. अनेक जण केवळ महापुरुषांच्या नावाने राजकारण करीत आहेत, परंतु मी हे स्मारक पूर्ण व्हावे, यासाठी प्रयत्न करणार, असे ठामपणे जरांगे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT