Manoj Jarange Patil reacts to Amruta Fadnavis' dinner invitation amid his ongoing Maratha reservation protest at Antarwali Sarati. Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : अमृता फडणवीसांचं जेवणाचं निमंत्रण जरांगे पाटलांनी स्वीकारलं; कधी येणार दिवसही सांगितला...

Jarange Patil on Amruta Fadnavis Dinner Invite : अमृता फडणवीस यांनी जेवणाचं निमंत्रण दिलं आहे. यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, "ताईंनी ज्या मायेच्या आणि आपुलकीच्या भावनेतून आपल्याला जेवणाचं निमंत्रण दिलं, त्याच भावनेतून आपण त्यांना उत्तर दिलं आहे. त्यांनी आमच्या बाजूनेही विचार करावा."

Jagdish Patil

Jalna News, 10 Sep : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मागील 13 दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. सरकारच्या शिष्टमंडळासोबत त्यांच्या चर्चेच्या फेऱ्या झाल्या, मात्र त्यातून अद्याप तोडगा निघालेला नाही.

त्यामुळे जरांगे यांनी उपोषण सुरूच ठेवले असून, सरकारने मराठा समाजाच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. तसेच मुंबईकडे जाण्यावरही ते ठाम आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांना घरी जेवणाचं निमंत्रण दिलं. "मनोज जरांगे पाटील हे माझे भाऊ आहेत आणि मी त्यांना घरी जेवायला येण्याचं निमंत्रण देते," असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या निमंत्रणाची चर्चा सुरू असतानाच जरांगे पाटील यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळावर पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे यांनी अमृता फडणवीस यांच्या निमंत्रणाला सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, सध्या आंदोलन सुरू असल्याने जेवायला जाण्याची ही योग्य वेळ नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

"ताईंनी सांगितलंय तर जेवायला पण जाऊ, पण भाऊबिजेच्या टायमिंगला जाऊ. आता आंदोलन सुरू आहे. भाऊ मैदानात असताना, भाऊ संकटात जात असताना बहिणीने तेवढा बारकाईने विचार करावा. आज मात्र जेवायला बोलवू नये," असं जरांगे म्हणाले.

तसंच, भाऊबिजेच्या दिवशी अमृता फडणवीस यांनी आपल्याला बोलावल्यास आपण साडीचोळी घेऊन त्यांच्याकडे जाऊ, असंही जरांगे यांनी सांगितलं. "बहिणीने आम्हाला भाऊबिजेला बोलवावं, साडीचोळी घेऊन जातो, हा दिलेला शब्द आहे मनोज जरांगेंचा," असं त्यांनी म्हटलं.

मात्र, सध्या आपण आंदोलनाच्या मैदानात असून अशा वेळी जेवणासाठी गेल्यास आंदोलनाच्या भूमिकेवर परिणाम होऊ शकतो, असं जरांगे यांनी सूचित केलं. "आज लढायच्या मैदानातून तुम्ही जेवायला या म्हणता, तर हार पत्करावी लागेल ताई," असं ते म्हणाले.

अमृता फडणवीस यांनी ज्या मायेच्या आणि आपुलकीच्या भावनेतून आपल्याला जेवणाचं निमंत्रण दिलं, त्याच भावनेतून आपण त्यांना उत्तर दिलं असल्याचंही जरांगे यांनी स्पष्ट केलं. "ताईंनी तो विचार, दृष्टिकोन आणि ती मायेची भावना आमच्या बाजूने ठेवावी. ताईंनी ज्या भावनेने आवाहन केलंय, त्याच भावनेने आपण त्यांना उत्तर दिलं आहे. पण आता ती वेळ नाही," असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT