Abdul Sattar On Manoj Jarange Sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar News: मनोज जरांगे पाटलांना बदनाम करण्याचं षडयंत्र, भेटीनंतर अब्दुल सत्तार सहा कोटींच्या आरोपावरही स्पष्टच बोलले

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांना मी पंचवीस वर्षापासून ओळखतो. त्यांच्यावर केले जाणारे आरोप हे त्यांना बदनाम करण्यासाठी केले जात आहेत. ते कितीही कोटी दिले तरी विकले जाणार नाहीत हे लक्षात आल्यामुळे त्यांच्याविरोधात राजकीय षडयंत्र रचले गेले आहे, असे या सगळ्या आरोपांवरून स्पष्ट होते.

Jagdish Pansare

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांना मी पंचवीस वर्षापासून ओळखतो. त्यांच्यावर केले जाणारे आरोप हे त्यांना बदनाम करण्यासाठी केले जात आहेत. ते कितीही कोटी दिले तरी विकले जाणार नाहीत हे लक्षात आल्यामुळे त्यांच्याविरोधात राजकीय षडयंत्र रचले गेले आहे, असे या सगळ्या आरोपांवरून स्पष्ट होते.

माझ्यावर जरांगे पाटील यांना सहा कोटी रुपये दिल्याचा आरोप करणाऱ्याला आपण कायदेशीर धडा शिकवू, असा इशाराही शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दिला. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनच करू नये, अशी आपली इच्छा होती, त्यासाठी अंतरवाली सराटीत आपण त्यांची भेट घेतली होती.

शिवसेना आमदार अब्दुल सत्तार म्हणाले, मी शनिवारी (ता.19) मनोज जरांगेंच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी त्यांना भेटलो. रुग्णालयातून सुटी झाल्यानंतर पुन्हा अंतरवाली सराटीत जाऊन त्यांची भेट घेणार असल्याचं सत्तार यांनी माध्यमांना सांगितले. छत्रपती संभाजीनगर येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जरांगे पाटील यांची सत्तार यांनी सायंकाळी भेट घेतली. त्यानंतर माध्यमांच्या प्रश्नाला ते सामोरे गेले.

मी मनोज जरांगे पाटील यांना संजय शिरसाट यांची बदनामी करण्यासाठी सहा कोटी रुपये दिले, मला पालकमंत्री व्हायचे आहे, हा आरोप करणारा जो कोणी आहे, त्याच्या बुद्धीची मला कीव येते. त्याचा बंदोबस्त कसा करायचा? कायदेशीररित्या त्यांच्यावर कशी कारवाई करायची? या संदर्भात आपण वकिलाशी बोलणार आहोत.

संजय शिरसाट हे माझे मित्र आहेत, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मीच त्यांच्या सूचक होतो. त्यामुळे अशा आरोपांमध्ये काही तथ्य नाही. असे बिनबुडाचे आरोप करणाऱ्या व्यक्तीची लायकी देखील तपासली पाहिजे, असे म्हणत सत्तार यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले.

काँग्रेसचे नेते विजय वड्डेटीवार यांनी देखील चौदाशे कोटींच्या टेंडरसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्याचा आरोप केला होता. यावर वड्डेटीवार यांनी कधी एवढे पैसे पाहिले होते का? असा टोला लगावला.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी मोठा लढा उभारला आहे. त्यांना व त्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचेच टेंडर कुणी दिले आहे का? अशी शंका आता येऊ लागली आहे, असा चिमटाही सत्तार यांनी काढला.

लोकप्रतिनिधींनी संवेदनशीलता दाखवावी? नांदेड येथील दुष्काळाच्या प्रश्नावर आयोजित बैठकीत खासदार संजय जाधव यांनी काजू-बदामावर ताव मारल्यावरून सुरू असलेल्या टीकेवरही सत्तार यांनी भाष्य केले. लोकप्रतिनिधींनी अशावेळी संवेदनशीलता दाखवायला हवी. सगळे खापर अधिकाऱ्यांवर फोडून चालणार नाही. तरी देखील संजय जाधव यांना माफ करावे, अशी विनंती सत्तार यांनी केली.

मराठवाड्यासह राज्यात दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, यासाठी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत, असेही सत्तार यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT