Maratha Kunbi Certificate Sarkarnama
मराठवाडा

Maratha Kunbi Certificate : कुणबी प्रमाणपत्रांवर सरकार कडक; जरांगे पाटील ‘चलो मुंबई’वर ठाम, आज मोठा निर्णय

Manoj Jarange Patil may announce the next phase of his Maratha reservation agitation as the government maintains a strict stand on Kunbi certificates : मराठा आरक्षणाच्या मागणीवर जरांगे पाटील आक्रमक; वंशावळ आणि पुराव्याशिवाय कुणबी दाखला नाही, जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांची स्पष्ट भूमिका

Pradeep Pendhare

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी, 'चलो मुंबई'चा निर्णय आज जाहीर करणार आहेत. जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार कुणबी प्रमाणपत्रांच्या वितरणाचा आकडा भाजप मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केला आहे. तसेच कुणबी प्रमाणपत्रांसाठी गावागांवत 17 सप्टेंबरपर्यंत शिबिरे देखील घेतली जात आहेत. याचवेळी अर्ज करेल त्याला प्रमाणपत्र देऊ, असेही जाहीर केले आहे.

परंतु प्रशासन आणि सरकारने कुणबी पुराव्याशिवाय कोणालाही दाखले दिले जाणार नाहीत, अशी कडक भूमिका घेतली आहे. जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी तसे पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. प्रशासन आणि सरकारच्या या भूमिकेमुळे जरांगे पाटील अधिक आक्रमक होतील, असे संकेत मिळत आहे.

जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणाबाबत प्रशासन आणि सरकारच्या भूमिकेवर उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामांची व नियमांची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी मित्तल यांनी दिली. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कायदेशीर नियमांचे पालन करणे आणि वंशावळ सिद्ध करणे बंधनकारक आहे. योग्य त्या पुराव्यांशिवाय कुणालाही दाखले दिले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

नागरिकांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी येताना नोंदीचे आवश्यक पुरावे सोबत घेऊन यावेत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. नियमानुसार अर्ज केल्याशिवाय दाखले मिळणार नसून वंशावळ सिद्ध करणे अत्यंत गरजेचे आहे. नियमानुसार अर्जदारांना एसईबीसी किंवा कुणबी (Kunbi) यापैकी एकाच पर्यायाची निवड करावी लागेल. या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे मित्तल यांनी सांगितले.

जात प्रमाणपत्रासाठी राबविण्यात येणारी शिबिरे केवळ आंदोलनापुरती राबवली जात आहेत की, आणखी काही उद्देश आहे? मिळालेले जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी काही जणांच्या सल्ल्याने ही शिबिरे ठेवली आहेत का, ते पाहू, असा संशय मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितीत केला.

जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन

सरकारने शिष्टमंडळ पाठवायचे की नाही, ते त्यांनी ठरवावे. ठरल्याप्रमाणे आम्ही मुंबईला जाणार असून 12 तारखेला आरपार आंदोलनाची दिशा ठरणार आहे, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांचे उपोषण आज 14व्या दिवशीही सुरू आहे. आंदोलन सुरू असताना गुन्हे दाखल झाले तरी समाजाने मागे हटू नये, असेही त्यांनी आवाहन केले.

जरांगे अन् सरकारमधील संघर्ष तीव्र

जरांगे पाटील आरक्षणासाठी चलो मुंबईचा नारा देत आहेत, तर दुसरीकडे कुणबी नोंदीवरून सरकार अन् प्रशासन कडक भूमिका घेत आहे. यातून दोघांमधील संघर्ष आखणी तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT