Manoj Jarange PC Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Indefinite Hunger Strike : गावागावांत उपोषण सुरू करा, जीवितास धोका झाल्यास मुख्यमंत्री जबाबदार; जरांगे आक्रमक

Manoj Jarange Patil News : "आता जे काही होईल, त्याला जबाबदार सरकार..."

Chetan Zadpe

Manoj Jarange Press Conference : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषण आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. आज चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती कालच्या तुलनेत खालावलेली आहे. बोलताना त्यांना त्रासही जाणवत होता. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हजारो लोक उपोषण आंदोलन करणार आहेत, यापैकी कुणाच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असेल, असा खुला इशारा दिला आहे. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनोज जरांगे म्हणाले, "आरक्षणासाठी कुणीही आत्महत्या करू नये. उग्र आंदोलन करू नका, आपल्याला शांतते आंदोलन करायचं आहे. उद्यापासून ज्यांना शक्य आहे, त्या सर्वांनी उद्यापासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करा. गावागावांत उद्यापासून केवळ पाणी घेऊन हजारो लोकांनी हे आंदोलन उपोषण करा, असे आवाहन जरांगे यांनी केली आहे.

जरांगे म्हणाले, "कुठल्याही नेत्यांना गावात फिरू देऊ नका. उद्यापासून हजारो लोक उपोषणावर बसतील. सरकारने आंदोलन गंभीर्यानं घेऊन सरकारने तातडीने आरक्षण जाहीर करावं. आता यापुढे जे काही घडेल, त्याची जबाबदारी सरकारची असेल. उपोषण आंदोलनादरम्यान कोणाच्याही जीवितास धोका निर्माण झाल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री आणि सरकारची असेल, असा इशाराच जरांगे यांनी दिला आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT