Manoj Jarange Patil Rally Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil Rally News : नांदेड जिल्ह्यात पाच सभा, जरांगे पाटलांची तोफ कोणावर धडाडणार...

Laxmikant Mule

Maratha Reservation News : मराठा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील आपल्या सभांचा चौथ्या टप्पा सुरू केला असून अंगावर येणाऱ्या नेत्यांना शिंगावर घेण्याची भूमिका त्यांनी घेतल्याचे दिसून येत आहे. (Manoj Jarange Patil Rally News) कुणबी जातीचे प्रमाणपत्र आणि त्याआधारे सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली साडेतीन महिन्यांपासून राज्यात आंदोलन सुरू आहे.

अंतरवाली सराटी येथे आंदोलकांवर पोलिसांकडून झालेला हल्ला, त्यानंतर राज्यात उमटलेले पडसाद आणि मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर बेमुदत उपोषण मागे घेतल्याने सरकारचा जीव भांड्यात पडला होता. (Maratha Reservation) पण एका महिन्याच्या मुदतीनंतरही सरकारने दिलेला शब्द पाळला नाही आणि जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसत सरकारला जेरीस आणले.

सरकारने पुन्हा दोन महिन्यांची मुदत मागून घेत नोंदी तपासण्यासाठी शिंदे समितीला कामाला लावले. (Ashok Chavan) २४ डिसेंबरची डेडलाईन दिल्यानंतर आता जरांगे पाटील यांची चौथ्या टप्प्याचा संवाद दौरा सुरू केला आहे. आता त्यांचा हा संवाद दौरा (Nanded) नांदेड जिल्ह्यात होणार असून तिथे जरांगे पाटील यांच्या पाच सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांच्याकडेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्षपदही होते. भाजपने दिलेले मराठा आरक्षण महाविकास आघाडी सरकारला टिकवता आले नाही, असा आरोप सातत्याने महायुतीकडून केला जातो. तेव्हा उपसमितीचे अध्यक्ष राहिलेल्या अशोक चव्हाणांकडेही त्यांचा रोख आहे.

जरांगे पाटील यांच्या आंदोलना दरम्यान, राजकीय नेते, मंत्री, आमदार खासदारांना गावंबदी करण्यात आली तेव्हा याचा फटका अशोक चव्हाण यांना त्यांच्याच जिल्ह्यात बसला होता. काळे झेंडे, निदर्शने आणि मराठा आरक्षणासाठी काय केले? असा जाब त्यांना आंदोलकांनी विचारला होता. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात होणाऱ्या पाच सभांकडे सगळ्यांच लक्ष लागले आहे.

नांदेड जिल्ह्यात याआधीच्या टप्प्यात मनोज जरांगे पाटील यांच्या चार सभा झाल्या होत्या. या सभांना अभुतपुर्व असा प्रतिसाद मिळाला होता. अंतरवाली सराटी येथे झालेल्या सभेलाही नांदेड जिल्ह्यातील लाखो समाज बांधवांनी हजेरी लावली होती. दरम्यान, अशोक चव्हाण, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांना गावबंदीचा फटका बसला होता.

गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील व मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद वाढला आहे. ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्षही होतांना दिसत आहे. अशावेळी नांदेड जिल्ह्यातील बारड येथे दि. 7 तर आठ डिसेंबरला जिजाऊनगर नांदेड, मारतळा (ता. लोहा) नरसी (ता. नायगाव) कंधार येथे सभांचे आयोजन करण्यात आले असून त्याची जय्यत तयारीही सुरू आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT