Manoj Jarange Patil Speech : लोकांना घराघरात जाऊन आरक्षणाची माहिती द्या, आपल्याला आरक्षण आताच पाहिजे, त्यासाठी प्रत्येकाने या लढाईत सामील व्हावे, हाता तोंडाला आलेला घास आता जाऊ द्यायचा नाही. सरकारने आता जर आरक्षण २४ ऑक्टोबरपर्यंत नाही दिले, तर इतक्या मोठ्या प्रमाणत आंदोलन होईल की सरकार ते पेलू शकणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी बीड जिल्हयात नेकनूर जवळील सफेपूर फाटा येथील सभेत दिला. यावेळी बीडमध्ये झालेली आत्महत्या बदल संवेदना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली व या पुढे कोणी आत्महत्या करू नका, असे आवाहन जरांगे पाटील यानी केले. (Latest Marathi News)
'मराठा आरक्षणाची ही संधी पुन्हा नाही, त्यामुळं या संधीच सोन करा,' असे उदगार मनोज जरांगे पाटील यांनी काढले. 'सरकार त्यांचं काम करतंय, आपण आपलं काम करा,' या आंदोलनाला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यायची आहे, असे आवाहन संपूर्ण मराठा समाजाला जरांगे पाटील यांनी या वेळी केले.
जरांगे पाटील म्हणाले, "सरकार माझी कुठ चूक होते का? याची वाट पाहत आहे. त्यांना हे आंदोलन धुळीत मिसळायचे आहे, पण मी पण खानदानी मराठा असल्याचे त्यांनी या वेळी सागितले. माझी चूक मी कधी होऊ देणार नाही व सर्व मराठा समाजाने पण कोणती चूक करू नये, एक जुना पुरावा मिळाला तर काही जातींना आरक्षण दिले आहे. पण मराठा समाजाकडे हाजारो पुरावे असताना सुद्धा हे आपल्याला आरक्षण देत नाहीत. पण मी हे आरक्षण घेतल्या शिवाय मागे हटणार नाही, असा विश्वास या त्यांनी व्यक्त केला.
(Edited By - Chetan Zadpe)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.