Antarwali Sarati Rally Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Rally In Antarwali Sarati : 'एक मराठा लाख मराठा' घोषणा देत समाज बांधव अंतरवालीकडे रवाना

Maratha Reservation : सभा ठिकाणी तब्बल 150 खासगी डॉक्टर, 10 फिजिशियन तसेच 50 फार्मासिस्ट

Datta Deshmukh

Beed Political News : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे शनिवारी होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या ‘मराठ्यांच्या सभेचे’ स्पिरीट जिल्ह्यातील समाजाच्या घराघरांत आणि मनामनांत असल्याचे चित्र आहे. समाज बांधव शुक्रवारपासूनच अंतरवालीकडे गेले. भगवे ध्वज लावलेल्या वाहनांतून भगव्या टोप्या परिधान केलेले समाज बांधव ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत रवाना झाले. (Latest Political News)

अंतरवाली सराटी येथे गेल्या महिन्यात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण केले तेव्हा त्यांच्या नियमित उपोषणात जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गोदाकाठ आघाडीवर होता. आंदोलनावर पोलिसांच्या लाठीहल्ल्याचे सर्वाधिक पडसाद देखील जिल्ह्यात उमटले. उपोषणे, धरणे, जाळपोळ अशा प्रकारे जिल्ह्यातून निषेध नोंदविण्यात आला. सभेच्या निमित्ताने जिल्ह्यात आलेल्या आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सभांना जिल्ह्यात उदंड प्रतिसाद मिळाला.

दरम्यान, आता सभेच्या पार्श्वभूमीवर देखील जिल्ह्यात प्रचंड उत्साह आहे. गावोगावी तरुणांनी पुढाकार घेऊन वाहनांची सोय केली आहे. यासाठी स्थानिक पातळीवर जेवण, नाष्टा याचीही तजवीज करण्यात आली. यासाठी मागील काही दिवसांपासून गावोगावी तयारीच्या बैठका होत आहेत.

आता सभेचा मुहूर्त आल्याने भगवे ध्वज, भगव्या टोप्या घालून 'एक मराठा लाख मराठा', अशा घोषणा देत शुक्रवारपासूनच समाज बांधव अंतरवाली सराटीकडे रवाना झाले. सभेला सर्वाधिक समाज जिल्ह्यातील असा अंदाज बांधला जात आहे. (Maharashtra Political News)

दरम्यान, आंतरवाली सराटी येथे सभेची जोरदार तयारी केलेली आहे. सभा ठिकाणी तब्बल 150 खासगी डॉक्टर, 10 फिजिशियन तसेच 50 फार्मासिस्ट आणि परिचारिका, प्रशिक्षणार्थी यांची 10 पथके तैनात असणार आहेत. तसेच 108 च्या रुग्णवाहिकाही जिल्हा आरोग्य प्रशासनाने तयार ठेवल्या आहेत. या सभेवेळी कुणाची तब्येत बिघडली किंवा कुणाला काही त्रास झाला तर तातडीने उपचार मिळावेत, यासाठी खबरदारी म्हणून मराठा वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून डॉक्टरांची सुविधा असणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT