Manoj Jarange News Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Rally News : जरांगेंचे बंद फेसबुक अकाउंट चोवीस तासांत सुरू...

Jalna News : जरांगे यांच्या सभेला अतिप्रचंड प्रतिसाद मिळाला, सभा संपल्यानंतर गर्दी ओसरायला रात्र झाली.

Jagdish Pansare

Maratha Reservation News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्य सरकारला दिलेली डेडलाइन काल १४ आॅक्टोबर रोजी संपली. जाहीर केल्याप्रमाणे जरांगे पाटील यांनी काल अंतरवाली सराटीतील १७० एकर जागेवर भव्यदिव्य जाहीर सभा घेतली. (Manoj Jarange News) राज्याच्या कानाकोपऱ्यातून या सभेला लाखोंची गर्दी जमली होती. या सभेला जे उपस्थित राहू शकणार नाहीत, त्यांच्यासाठी जरांगे यांच्या फेसबुक पेजवरून लाइव्ह लिंक व्हायरल करण्यात आली होती.

पण सभा सुरू होण्याच्या दोन तास आधीच मनोज जरांगे पाटील यांचे फेसबुक बंद करण्यात आले होते. जरांगे यांनी स्वतः आपल्या भाषणात याचा उल्लेख केला. (Jalna) जरांगे म्हणाले, राज्य सरकार बिथरलंय त्यांनी माझ फेसबुक अकाउंटच बंद करून टाकलं. (Maratha Reservation) पण टीव्ही चॅनल, त्यांनी व्हॅनमधून दाखवलेलं थेट प्रक्षेपण राज्यात, देशात आणि जगात पोहाेचलं ते कसं थांबवणार, असा सवालही जरांगे यांनी सरकारला केला होता.

जरांगे यांच्या सभेला अतिप्रचंड प्रतिसाद मिळाला, सभा संपल्यानंतर गर्दी ओसरायला रात्र झाली. या सभेने राजकारण्यांना धडकी भरवली. (Marathwada) अखेर जरांगे यांच्या सभेच्या दोन तास आधी बंद केलेले त्यांचे फेसबुक पेज चोवीस तासांत पुन्हा सुरू करण्यात आले आहे. ज्या लोकांना गर्दीमुळे सभास्थळापर्यंत पोहाेचता आले नाही, त्यांच्यासाठी कालच्या सभेचा व्हिडिओ या पेजवर व्हायरल करण्यात आला आहे.

राज्यातील सर्वात मोठी सभा म्हणून जरांगे यांच्या सभेचा उल्लेख केला जातोय. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या ४२ वर्षांच्या काडी पहिलवान असलेल्या जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत राज्यातला सगळा मराठा समाज एकवटून दाखवला. जे राज्यातील एकाही राजकारण्याला आजपर्यंत जमले नाही, ते अंतरवाल सारख्या छोट्या गावातील एका मराठा तरुणाने करून दाखवले.

राजकारण्याकडून झालेले फुटीचे प्रयत्न, आरोप या सगळ्यांना जरांगे पाटील पुरून उरले. फेसबुक पेज बंद करूनही काही साध्य होणार नाही, हे लक्षात आल्यानंतर आज जरांगे यांचे फेसबुक पुन्हा पूर्ववत सुरू झाले आहे. मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत ३५ आंदोलन केलेल्या जरांगे यांचे फेसबुकवर ५५ हजारांहून अधिक फाॅलोअर्स आहेत, तर ५५ हजार जणांनी त्यांच्या पेजला पसंती दर्शवली आहे. अंतरवाली सराटीतील आंदोलनानंतर जरांगे पाटील यांच्या फेसबुक मित्रांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळाले आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT