Maratha Reservation Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange: 'अल्टीमेटम'च्या आदल्या दिवशी जरांगेंची तोफ बीडमध्ये धडाडणार

Maratha Reservation: श्री क्षेत्र नारायणगड विद्यार्थी वसतीगृहाच्या बाजूच्या मैदानावर दुपारी ही सभा होणार.

Datta Deshmukh

Beed Political News: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेले अल्टीमेटम संपण्यास दहा दिवस बाकी आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरला आहे. जरांगे पाटलांची पुढची सभा शनिवारी (ता. २३) बीड येथे होणार आहे

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण द्यावे, या मागणीसाठी जरांगे पाटलांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील दिशा स्पष्ट करु, असा इशारा दिला आहे. जरांगे पाटील यांच्या राज्यभर विविध ठिकाणी सभा होत आहेत.

बीड सभेच्या तयारीसाठी आज (शुक्रवार) सुर्या लॉन्सवर बैठक होणार आहे. बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आले आहे.

दोन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात देखील अंबासाखर, बोरीसावरगाव, धारुर व हरकी लिमगावला सभा झाल्या. आता ता. २३ रोजी बीडला इशारा सभा निश्‍चित झाली आहे. गुरुवारी (ता. १४) समाजबांधव व मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी छत्रपती संभाजी नगरला उपचार घेणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. यानंतर बीडला सभा घेण्याचे ठरले. बीड-अहमदनगर रस्त्यावरील काकडहिरा भागातील श्री क्षेत्र नारायणगड विद्यार्थी वसतीगृहाच्या बाजूच्या मैदानावर दुपारी ही सभा होणार आहे.

अंतरवाली सराटी (Antarwali Sarathi Lathicharge) येथील हिंसाचार प्रकरणामध्ये बीडच्या गेवराई येथील ऋषिकेश बेदरे याच्यासह अन्य तिघा जणांना अंबड पोलिसांनी अटक केली होती. काल(गुरुवार) औरंगाबाद उच्च न्यायालयाकडून ऋषिकेश बेदरे याला अटी शर्तीवर जामीन देण्यात आला आहे.

ऋषिकेश बेदरे याला बीड आणि जालना जिल्ह्यात पुढील 90 दिवस येण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे. जर बेदरे याला बीड किंवा जालना जिल्ह्यातील एखाद्या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवायचा असेल, तर पोलिस प्रशासनाची परवानगी घेऊनच त्याला जावे लागणार आहे, या अटीवर त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT