Farmer Bullock Cart Yatra: Sarkarnama
मराठवाडा

Maratha Aarakshan: आरक्षणासाठी बळीराजाही मैदानात; जरांगेंच्या पाठिंब्यासाठी पंढरपूर ते अंतरवाली बैलगाडी यात्रा

Farmer Bullock Cart Yatra: पंढरपूरच्या चळे गावातील बारा शेतकऱ्यांनी बैलगाडीमधून यात्रा काढत जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रवाना झाले आहेत.

Ganesh Thombare

धनंजय शेटे :

Bhum News: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाज आंदोलन करत असून अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. आता पंढरपूरच्या चळे गावातील बारा शेतकऱ्यांनी चक्क बैलगाडीमधून यात्रा काढत मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रवाना झाले आहेत.

राज्य सरकारला शेतकरी हाच कुणबी मराठा आहे, हे दाखवून देण्यासाठी बैलगाड्या घेऊन या शेतकऱ्यांनी पंढरपूर ते अंतरवली सराटी या ठिकाणी निघाले आहेत, भूम शहरात गाड्या दाखल होताच भूम शहरातील मराठा बांधवांनी हलगी ढोल ताशा वाजवत या मराठा शेतकऱ्यांचे जोरदार स्वागत केले आहे.

"सुलतानी सरकारला कुणबी मराठा हाच कुणबी व मराठा शेतकरी आहे, हे अद्यापही लक्षात येत नसल्याने या शेतकऱ्यांनी लक्षात आणून देण्यासाठी आम्ही शेतकरी बांधव रस्त्यावर उतरून आमचे शेतातले काम बाजूला ठेवून आम्ही शेतकरी मराठा कुणबी मराठा आहोत, हेच दाखवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत", असे बैलगाडी घेऊन जाणारे पांडुरंग खिलारे यांनी सांगितले.

यावेळी सुरेश मोरे, सिद्धेश्वर खिल्लारे, लिंबराज मोरे, सुरेश मोरे, बाबू खिल्लारे, किसन पाटील तानाजी घाडगे, संतोष मिसाळ, पांडुरंग खिल्लारे कांतीलाल मोरे, बिबीशन मोरे, गणेश कदम आदी चळेगावचे शेतकरी बांधव अंतरवलीला बैलगाड्या घेऊन निघाले आहेत.

दरम्यान, मराठा संघटनांनी ठिकठिकाणी राजकीय नेत्यांना गावबंदी केलेली आहे, तर काही ठिकाणी नेत्यांच्या गाड्यांची तोडफोड करत लक्ष्य केले आहे. मराठा आरक्षणावरुन काही जणांनी आपल्या पदाचा राजीनामेही दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात मराठा आरक्षणावरून वणवा आणखी पेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार यावर काय तोडगा काढतं, याकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT