Prakash Ambedkar News Sarkarnama
मराठवाडा

Jalna Maratha Protest : येणाऱ्या अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे..

Prakash Ambedkar News : शिक्षण क्षेत्रात मराठा समाजाला आरक्षण गरजेचे आहे. वंचित समुहाची सुची करूण इतरांच्या बरोबर आरक्षण आणावे.

Jagdish Pansare

Maratha Reservation News : केंद्रात मराठा आरक्षणाबाबत खासदार उदासीन दिसतात. येणाऱ्या अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मांडली. (Prakash Ambedkar Visit Antarwali News) अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या उपोषणकर्त्यांची भेट प्रकाश आंबेडकर यांनी घेतली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्याशी सविस्तर चर्चाही केली.

आरक्षणाबाबत बाबासाहेब आंबेडकर यांनी भुमीका मांडली होती. (Maratha Reservation) त्यासाठी यादीही सादर केली होती. शिक्षण क्षेत्रात मराठा समाजाला आरक्षण गरजेचे आहे. वंचित समुहाची सुची करूण इतरांच्या बरोबर आरक्षण आणावे, असा आग्रह बाबासाहेब आंबेडकर यांचा होता. (Prakash Ambedkar) बी.पी.मंडळ आयोगात काहींना न्याय मिळाला, तर काहीना मिळाला नाही.

देशातील नागरीक या देशाचे मालक आहेत, खासदार-आमदार नाहीत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी केंद्राला व राज्य शासनाला न्यायलयात भांडावे लागेल. (Jalna) त्यासाठी शासनाने बाजू मांडावी, असा सल्लाही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिला.

देशात, राज्यात आज दडपशाही सुरू आहे. या ठिकाणी जो हल्ला झाला त्याचा निषेध करतो, जनता दडपशाही खपवून घेणार नाही, असा इशाराही आंबेडकरांनी दिला. दरम्यान आज आठव्या दिवशी आपले उपोषण सुरू असुन मार्ग निघाला नाही तर या पुढेही सुरुच राहणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT