Jalna : मराठा आरक्षणासाठी उग्र आंदोलन छेडणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पुन्हा ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मराठा समाजाची बैठक झाली. यात पुढील लढ्याबाबत निर्णय घेण्यासाठी येत्या चौदा तारखेला अंतरवाली सराटीत जाहीर आंदोलन सभेचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर साखळी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्रभर दौरा करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे, या मागणीवर एक मताने ठरावही करण्यात आला. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिकाही बैठकीत घेण्यात आली. सरकारला दिलेल्या महिनाभराच्या मुदतीत आरक्षणाची मागणी पूर्ण झाली नाही, तर जरांगे पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसून सरकार विरोधात दंड थोपटणार आहेत.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील नेत्यांना अंतरवाली सराटीत येण्याचे भाग पाडणारे, आंदोलनाचा प्रमुख चेहरा ठरणारे जरांगेंना गुरुवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यानंतर त्यांनी उपोषणस्थळी पुन्हा साखळी उपोषण सुरू केले आहे.
यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवाली सराटीत जाऊन जरांगेंशी संवाद साधल्यानंतर जरांगेंनी आपल्या आमरण उपोषणाची सांगता केली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवसांपासून उपचार सुरू होते. डिस्चार्जनंतर ते शासकीय रुग्णवाहिकेतून थेट उपोषणस्थळाकडे रवाना झाले होते.
Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.