Chhagan Bhujbal, Manoj Jarange Patil
Chhagan Bhujbal, Manoj Jarange Patil Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : "...तर भुजबळ मराठ्यांचे नेते बनले असते"; जरांगे-पाटील असं का म्हणाले?

Jagdish Patil

Chhatrapati Sambhajinagar News, 22 June : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचीतील वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. 'काहीही झालं तरी मी भुजबळांना सोडणार नाही. धनगर आणि मराठा समाजातील वाद त्यांनी पेटवलाआहे', असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला.

तर भुजबळ एका जातीची बाजू घेऊन बोलतात, ते विनाकारण मराठ्यांच्या विरोधात जात आहेत. पण त्यांनी थोडं मोठं मन केलं असतं तर ते मराठ्यांचेही नेते बनले असते असं मोठं विधान जरांगे यांनी केलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रसार माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे-पाटील यांनी मंत्री छगन भुजबळांवर हल्लाबोल केला.

भुजबळांनी (Chhagan Bhujbal) मराठा-धनगर समाजात वाद पेटवला. आता त्यांना सुट्टी नाही. त्यांचे राजकीय करिअर उद्ध्वस्त केलं नाही तर नाव बदलेन असा इशारा त्यांनी यावेळी दिला. जरांगे म्हणाले, "छगन भुजबळांनी मराठा-ओबीसी वाद निर्माण केला आणि आता ते मराठा आणि धनगर समाजात वाद निर्माण करत आहेत. दोन्ही समाजात द्वेष निर्माण करण्याचे काम ते करत आहेत. आम्ही हे कधीच खपवून घेणार नाही, आता त्यांना सुट्टी नाही. ओबीसींच्या इतर नेत्यांनी तरी भुजबळांसारखा जातीयवाद करू नये.

तर तुम्ही मराठ्याचंही नेते झाले असता

संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसाला साडेचारशे जाती महत्त्वाच्या की महाराष्ट्र महत्त्वाचा आहे? 450 जातीचे काम करतो म्हणता, म्हणजे, तुम्ही जातीवादच करत आहात. कारण तुम्ही बाकीच्या जाती सोडल्या, मराठ्यांना का सोडलं? मुद्दाम धनगर आणि मराठ्यांमध्ये वाद लावता. मराठ्यांना देऊ द्या ना, ते सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करु नका म्हणत आहेत. उलट त्यांनी मोठं मन करायला पाहिजे होतं. मराठ्यांनापण सामावून घेतलं असतं तर तुम्ही मराठ्याचंही नेते झाले असता. भुजबळांचं ऐकून सरकारने आमची नाराजी ओढावून घेऊ नये," असा इशारा जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला दिला.

मराठा समाजावर अन्याय होऊ देणार नाही

यावेळी जरांगे यांनी काहीही झालं तरी मराठा समाजावर अन्याय होऊ देणार नसल्याचंही म्हटलं. ते म्हणाले, "मी मराठा समाजावर अन्याय होऊ देणार नाही. वेळेप्रसंगी बलिदान देण्याची वेळ आली तरी मी घाबरणार नाही. मी कोट्यवधी मराठा समाजाची बाजू घेत आहे. माझा समाज माझ्या पाठीशी आहे. गोरगरीब मराठा समाजाची पोरं मोठं झाली पाहिजेत यासाठी मी लढत आहे. मराठा समाज एकत्र आला आहे, यामुळे यांचे पोट दुखत आहे. मराठा समाज एकत्र आला, त्याचे मतात रुपांतर झाल्यामुळे त्यांना मला हटवायचे आहे.", असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT