Maratha protester Dashrath Raikar died while participating in the Manoj Jarange Patil agitation at Antarwali Sarati. T Sarkarnama
मराठवाडा

Maratha protester death : मोठी बातमी! अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकाचा मृत्यू; जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी गेले ते परतलेच नाहीत

Manoj Jarange Patil Maratha Protest : दशरथ रायकर यांच्या संदर्भातील घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी रुग्णालयात धाव घेतली. दशरथ रायकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Jagdish Patil

Jalna News, 03 Sep : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या एका मराठा आंदोलकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दशरथ रायकर असे मृत आंदोलकाचे नाव असून ते बीड जिल्ह्यातील संगम येथील रहिवासी होते. या घटनेने आंदोलनस्थळी हळहळ व्यक्त केली जात आहे.

दशरथ रायकर हे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी बीडहून अंतरवाली सराटी येथे आले होते. गुरुवारी रात्री त्यांनी इतर आंदोलकांसोबत परिसरातील एका शेतात मुक्काम केला होता. शुक्रवारी सकाळी रायकर यांच्यासोबत झोपलेल्या इतर आंदोलकांना जाग आली.

मात्र, रायकर झोपेतून उठले नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. सहकाऱ्यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपस्थित आंदोलकांनी तातडीने रायकर यांना रुग्णवाहिकेतून अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

रायकर यांचा झोपेतच हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी रुग्णालयात धाव घेतली. रायकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे अंतरवाली सराटी परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT