Badam Rao Pandit vehicle  Sarkarnama
मराठवाडा

Badamrao Pandit News : माजी मंत्री बदामराव पंडित यांनाही मराठा आंदोलनाचा फटका; वाहनाच्या काचा फोडल्या!

Maratha Protesters : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून बीड जिल्ह्यात चार दिवसांपासून साखळी उपोषणं सुरू आहेत.

Datta Deshmukh

Maratha Reservation News : शिवसेनेचे (उबाठा) माजी मंत्री बदामराव पंडित यांनाही मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची झळ बसली आहे. आंदोलकांनी पंडित यांच्या वाहनाच्या काचा फोडल्या. गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे ही घटना घडली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून बीड जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून साखळी उपोषणे सुरू आहेत. कुठे कँडल मार्च, कुठे सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली जात आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथे आंदोलनाची मागणी करत एकाने पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्येचीही घटना घडली आहे, तर मादळमोही (ता. गेवराई) येथे आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध आंदोलन करण्यात येत होते.

यादरम्यान, शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित हे येथे सुरू असलेल्या मोहिमाता यात्रेनिमित्त दर्शनासाठी आले होते. या वेळी आंदोलकांनी त्यांच्या जीपच्या (क्रमांक एम. एच. २३ बी. सी. ५५५५) डाव्या बाजूच्या काचांवर दगड मारला आणि या वेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणाही देण्यात आल्या.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT