MLA Rajesh Tope News  Sarkarnama
मराठवाडा

MLA Rajesh Tope News : बेदरेने तो फोटो अंतरवालीत शरद पवारांच्या दौऱ्यात घुसून काढला असावा..

Jalna News : बीड येथील दंगल प्रकरणात अटक करण्यात आलेला ऋषीकेश बेदरे हा व्यक्ती माझ्या भागातील नसून यापूर्वी मी त्याला कधीही पाहिले नाही.

Jagdish Pansare

Maratha Reservation News : मराठा आरक्षणाच्या आंदोलना दरम्यान ३० आॅक्टोबर रोजी बीडमध्ये झालेल्या जाळपोळ प्रकरणात ऋषीकेश बेदरे या आरोपीला पोलिसांनी अटक केली. (Jalna News) त्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी बदरे यांचा शरद पवार, आमदार राजेश टोपे यांच्यासोबतचा फोटो समाज माध्यमांवर व्हायरल करत बेदरेला आशिर्वाद कोणाचा? असा सवाल उपस्थितीत केला.

त्यानंतर नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यासोबत बेदरेचा एक फोटो पोस्ट करत राणेंच्या आरोपाला प्रत्युत्तर देण्यात आले. तत्पुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबतही ऋषीकेश बेदरे असल्याचे फोटो सोशल मिडियावर झळकले. (Maratha Reservation) या सगळ्या प्रकारामुळे बेदरे यांचा विषय आज दिवसभर चर्चेत होता.

दरम्यान, माजी आरोग्य मंत्री आमदार राजशे टोपे (Rajesh Tope) यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि स्वतः टोपे यांच्यासोबत व्हायरल झालेल्या ऋषीकेश बेदरे यांच्या फोटो संदर्भात खुलासा केला आहे. सदरील व्यक्तीला आपण ओळखत नाही, तो आपल्या मतदारसंघातीलही नाही त्यामुळे माझा किंवा शरद पवारसाहेबांचा (Sharad Pawar) ऋषीकेश बेदरेसोबत कुठलाही संबंध जोडू नये.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बीड येथील दंगल प्रकरणात अटक करण्यात आलेला ऋषीकेश बेदरे हा व्यक्ती माझ्या भागातील नसून यापूर्वी मी त्याला कधीही पाहिले नाही व ओळखतही नाही. लाठीचार्ज झाल्यानंतर पवार साहेब अंतरवाली येथे आले असता त्याप्रसंगी ऋषीकेश बेदरे या व्यक्तीने जमावात घूसून काढलेला तो फोटो आहे. या पलीकडे त्याच्याशी माझा कुठलाही संबंध नाही व नव्हता.

पोलीस प्रशासनाने यासंदर्भात त्याची पाळेमुळे व सत्यता पडताळावी व यासंदर्भात कोणीही चुकीचे संबंध जोडू नयेत, असे आवाहन राजेश टोपे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे. ३० आॅक्टोबर रोजी माजलगांवचे आमदार प्रकाश सोळंके यांचे घर, नगरपरिषदेचे कार्यालय, तसेच बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी भवन, धैर्यशील सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडीत यांच्या घरावर हल्ला झाला होता.

प्रचंड प्रमाणात जाळपोळ, गाड्यांचे नुकसान यावेळी करण्यात आले होते. भाजप तसेच ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या प्रचार कार्यालयावरही हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी बीड पोलिसांनी दोनशेहून अधिक आरोपींना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले. यापैकीच एक आरोप ऋषीकेश बेदरे यांचे राज्यातील बड्या राजकीय नेत्यांसोबतची छायाचित्रे समाज माध्यमांवर व्हायरल झाली होती.

त्यापैकीच एक राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, घनसांवगीचे आमदार राजेश टोपे यांच्यासोबतचे होते. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्यानंतर टोपे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून बेदरे याच्याशी आपला व शरद पवार यांचा दुरान्वये संबंध नसल्याचे स्पष्ट करत पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही केली आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT