Nanded BJP News  Sarkarnama
मराठवाडा

Nanded BJP News : भाजप खासदाराच्या मतदारसंघातच `विकसित भारत रथ` रोखला..

Marathwada News : नांदेड जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून ही यात्रा सुरू करण्यात आली.

Laxmikant Mule

Maratha Reservation News : केंद्रातील मोदी सरकारने राबविलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी `विकसित भारत यात्रा` रथाच्या माध्यमातून माहिती देण्यात येत आहे. (Nanded BJP News) ही रथयात्रा पिंपळगाव (ता. अर्धापूर जिल्हा नांदेड) येथे आज सकाळी आली तेव्हा सकल मराठा समाजाच्या तरूणांनी ती रोखली.

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळत नाही तोपर्यंत गावात कोणाताही शासकीय कार्यक्रम होणार नाही, अशी भूमिका घेत हा कार्यक्रम बंद पाडला. गावातील नागरिक निघून गेल्याने प्रशासनाला कार्यक्रम गुंडाळून पोलिसांच्या मदतीने गावा बाहेर जावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Nanded) यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात व महाराष्ट्रात विकसित भारत संकल्प रथ यात्रेला प्रारंभ करण्यात आला.

पिंपळगाव महादेव येथील मराठा समाज व सर्व समाज बांधव व ग्रामस्थांनी एकत्र येऊन "भारत सरकारचा कार्यक्रम की मोदी सरकारचा कार्यक्रम" असे आक्रमक भूमिका घेतली. (BJP) जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत गावात कोणताही कार्यक्रम संपन्न होऊ देणार नाही, असा इशारा यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक मार्गांनी आंदोलन करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींना गावंबंदी करण्यात आली असून गावोगावी गावबंदीचे फलक लावण्यात आले आहेत. याचा फटका खासदार, आमदार, मंत्र्यांना बसत आहे. कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी व नेते चोर पावलांनी गावांत जात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात विविध शासकीय योजनांची माहिती व संवादासाठी महाराष्ट्रात `विकसित भारत संकल्प यात्रे`च्या राज्यस्तरीय मोहिमेचा प्रारंभ राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. सदर यात्रा देशातील प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यातील गावोगावी राबविण्यात येत आहे.

नांदेड जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून ही यात्रा सुरू करण्यात आली. ही यात्रा जिल्ह्यातील सर्व तालुक्यात जाणार आहे. विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ पिंपळगाव महादेव येथे येताच ग्रामस्थ व मराठा समाज बांधवांनी हा कार्यक्रम घेण्यात येऊ नये, असा पवित्रा घेतला होता. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक मस्के यांच्या पथकाने कडक बंदोबस्त दिल्याने सदर कार्यक्रम सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. पण या कार्यक्रमास गावातील एकही नागरीक उपस्थित राहीला नसल्याने प्रशासनाने काढता पाय घेत सदर कार्यक्रम गुंडाळला.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT