Maratha Reservation Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation : 'मराठा आरक्षण' स्टेटस ठेवत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने संपवले जीवन

सरकारनामा ब्यूरो

Maratha Reservation Latur News :

लातूरच्या मांजरा आयुर्वेदिक महाविद्यालयात मागच्या एक वर्षापासून BAMS चे शिक्षण घेणाऱ्या प्रदीप मत्ते या विद्यार्थ्यांने आपले जीवन संपवले आहे. आज सकाळी स्वतःच्या मोबाईलवर #मराठा आरक्षण अशा प्रकारचे स्टेटस ठेवत त्यांनी आत्महत्या केली.

प्रदीपने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. यानंतर त्याने राहत्या रूममध्येच गळफास घेत आत्महत्या केली. प्रदीप हा Beed च्या लोणी शहाजानपूर गावचा होता. वैद्यकीय शिक्षणासाठी तो लातूरमध्ये आला होता.

प्रदीपच्या आत्महत्येनंतर त्याच्या काकांनी मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील या्ंना फोन केला. मराठा आरक्षण पाहिजे, अशी मागणी त्याने केली आहे. त्याला एमबीबीएस व्हायचं होतं. पण मनाविरुद्ध जाऊन त्याने बीएएमएसला प्रवेश घेतला, असं त्याच्या काकांनी टाहो फोडत सांगितलं. मराठा आरक्षण मिळणार आहे. तरुणांनी संयम ठेवला पाहिजे, असे म्हणत जरांगे यांनी त्यांचे सांत्वन केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आरक्षणसाठी आत्महत्यांचे सत्र थांबत नाहीये. आरक्षणासाठी आधीची आत्महत्या झाल्या आहेत. लातूरमध्ये पुन्हा आत्महत्येचा प्रकार घडला. आरक्षणासाठी जरांगे पाटील आक्रमक आहेत. राज्यात ठिकठिकाणी सभा घेतल्यानंतर आता मुंबईत आंदोलनाची तयारी करण्यात येत आहे. मराठा आरक्षण घेणारच असा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. यामुळे जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाकडे आता सर्वांचे लक्ष आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT