Jalna: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या अल्टीमेटम संपण्यासाठी महिना बाकी आहे. मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी जरांगे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. पण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी होत असलेल्या आत्महत्येचे सत्र अद्यापही सुरुच आहे. माजी आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या गावात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला वाचविण्यासाठी गेलेल्या आईही भाजल्याची घटना आज (बुधवारी) घडली.
अंबड तालुक्यात पाथरवाला गावात ही घटना घडली. आरक्षणाच्या मागणीसाठी सूरज गणेश जाधव याने अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली. सूरज आत्महत्येचा प्रयत्न करीत असताना त्याला वाचविण्यासाठी त्यांच्या आईने आग विझवण्यासाठी प्रयत्न केला. यात दोन्हीही साठ टक्के भाजले. उपचारासाठी मायलेकाला गावकऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले आहे.
"घरची परिस्थिती हलाखी आहे. सूरज हा बारावीनंतर आयटीआय करीत होता. शिक्षणासाठी शुल्क भरण्यासाठी त्याला अनेक अडचणी येत होत्या. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्याने हे टोकाचं पाऊल उचलले," असे सुरजची आई मंगलबाई जाधव यांनी सांगितले. सरकार आरक्षणाच्या मुद्यावर ठोस निर्णय घेत नसल्याने या संपूर्ण घटनेला सरकारचं जबाबदार असल्याचं सुरज यांनी म्हटलं आहे.आई आणि मुलगा दोघे ही साठ टक्के भाजले असल्याने डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर रुग्णालयात हरवले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, आरक्षण मिळणारच, पण कुणीही आत्महत्या करु नका, असे आव्हान मनोज जरांगेंनी केले आहे. त्यानंतर मराठा समाजातील युवक आत्महत्या करीत असल्याने जरांगे पाटलांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.