Manoj Jarange Patil Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation : जरांगे-पाटील पोटदुखीने जेरीस; प्रकृतीही खालावली, उपचारास नकार दिल्याने टेन्शन

Avinash Chandane

Antarwali Sarati Jalna :

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांचे चौथे बेमुदत उपोषण जालन्या जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात सुरू आहे. यापूर्वीची तिन्ही उपोषणं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि मराठा आरक्षणाच्या ठाम आश्वासनामुळे त्यांनी सोडली. तरीही मराठ्यांच्या पदरात आरक्षण न मिळाल्याने ते पुन्हा उपोषणाला बसले आहे.

मनोज जरांगे-पाटील 10 फेब्रुवारीपासून पुन्हा अंतरवाली सराटी गावात बेमुदत उपोषणाला बसले आहेत. आणि आज सकाळपासून ते पोटदुखीने विव्हळत आहेत. त्यांची प्रकृतीही खालावत जात आहे. शिवाय पोटदुखीनेही ते त्रस्त झाले आहेत. तसा त्यांचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. (Maratha Reservation)

मनोज जरांगे-पाटील यांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. सकाळपासून ते पोटदुखीने व्याकूळ झाले आहेत. त्यांची प्रकृती खालावत असून, डॉक्टरांकडून उपचार घेण्यास त्यांनी नकार दिला आहे. अशातच त्यांच्या प्रकृतीच्या बातम्या ऐकून मराठा समाजील लोक उपोषणस्थळी येऊ लागलेत. (Manoj Jarange Patil is on indefinite hunger strike)

मराठा समाज संतप्त

जरांगे-पाटील यांच्या अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) गावातील उपोषणस्थळी मराठा समाजातील लोक जमू लागले आहेत. जरांगे-पाटील यांना काही झालं तर थेट मुंबईला जाऊ, असा इशारा इथल्या महिलांनी दिला, तर जरांगेंना त्रास देण्याचा प्रयत्न होतोय, अशाही प्रतिक्रिया येत आहेत. जरांगे-पाटलांची प्रकृती खालावत असताना सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण देण्याचे ठोस आश्वासन दिले जात नसल्याबद्दलही तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.

काल जरांगे-पाटील यांच्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी संध्याकाळी साडेसातच्या सु्मारास 'साम'चे प्रतिनिधी माधव सावरगावे (SAAM TV) यांच्या हस्ते जरांगे-पाटील एक ग्लास पाणी प्यायले होते. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती.

राज्य सरकारने 27 जानेवारीला 'सगेसोयरे' (Sagesoyare) या शब्दाचा समावेश करून सरकारने अधिसूचना काढली होती. आणि त्यावर हरकती मागवल्या आहेत. मात्र, सरकारने आता या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी जरांगे-पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. यामुळे सरकारवरील दबाव वाढला असून, सरकारने 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावले आहे.

(Edited by Avinash Chandane)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT