Maharashtra Vidhan Sabha Election: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणूक न लढविण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली आहे. एका जातीवर निवडणूक लढणं शक्य नाही, असे त्यांनी सांगितले. निवडणूक लढायची नाही, आता पाडापाडी करणार, असे ते म्हणाले. याला माघार नाही, गनिमी कावा म्हणतात, असे जरांगे यांनी ठामपणे सांगितले.
विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर 'मराठाबांधवांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत, ' असे आवाहन जरांगे यांनी केले. निवडणूक लढायची नाही, अर्ज मागे घ्या, असे त्यांनी मराठा उमेदवारांना सांगितले. निवडणुकीतून माघार घेतली असली तरी आंदोलन सुरुच राहणार, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.
"याला पाडा आणि त्याला पाडा ही आपली भूमिका नाही. कुणालाही पाडा आणि कुणालाही निवडून आणा," असं जरांगेंनी म्हटलं आहे.
राज्यातील किती विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार उभे करायचे, यावर काल (रविवारी) मध्यरात्री जरांगे व त्यांच्या समर्थकांमध्ये चर्चा सुरु होती. आज सकाळी जरांगे उमेदवार आणि मतदारसंघाचे नाव जाहीर करणार होते, त्यांच्या घोषणेकडे सगळ्याचे लक्ष लागले होते.
पण सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी पत्रकार परिषद घेऊन लढणार नाही पाडापाडी करणार, असे जाहीर केले. एकाच जातीवर निवडणूक लढणं शक्य नाही तसेच मित्रपक्षांची यादी न आल्यामुळे निवडणुकीतून माघार घेत असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.