Maratha Reservation News : मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत गावात पाय ठेवायचा नाही, असा इशारा देत मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री, आमदार, खासदारांना गावबंदी केली होती. (Maratha Protester) या आदेशाचे पालन राज्यभरात मराठा आंदोलकांनी केले आणि गावागावांत गावबंदीचे फलक लागले. केवळ फलकच लागले नाही, तर त्याची कडक अंमलबजावणीही सुरू झाली.
पण या गावबंदीचे बॅनर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या भोकरदन तालुक्यात फाडले आणि वाद चिघळला. त्यामुळे आता नेत्यांना गावात फिरणेही कठीण झाले आहे. मराठा आंदोलकांच्या रोषाला आज पुन्हा एकदा बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे (MLA Narayan Kuche) यांना सामोरे जावे लागले. अंबड तालुक्यातील शिराढोण गावात कुचे काही कार्यक्रमानिमित्त आले होते.
कुचे गावात आल्याचे कळताच मराठा तरुणांचा जमाव जमला आणि त्यांनी नारायण कुचे यांना गावात येण्यास मज्जाव केला. या वेळी कुचे समर्थक आणि मराठा तरुणांमध्ये बाचाबाचीही झाली. कुचे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत मराठा आंदोलकांनी कुचे यांना (Maratha Reservation) मराठा आरक्षण मिळेपर्यंत गावात पाय ठेवायचा नाही, असा दम भरला.
कुचे समर्थक आणि मराठा तरुण आक्रमक झाल्यामुळे प्रसंगावधान राखत कुचे यांनी गावातून काढता पाय घेतला. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू झाला आहे. ओबीसी नेतेही आक्रमक होऊन मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर वैयक्तिक टीका करू लागल्याने वातावरण अधिकच चिघळले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अंबड तालुक्यात झालेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यानंतर मराठा आंदोलकांनी लावलेले गावबंदीचे बॅनर फाडण्याचे प्रकारही वाढले. त्यामुळे मराठा आंदोलक अधिक आक्रमक झाले आहेत. नारायण कुचे यांना मराठा तरुणांच्या रोषाला याआधीही तोंड द्यावे लागले होते. आज पुन्हा त्यांना गावबंदी करण्यात आली आहे.
तीन दिवसांपूर्वी जालना येथे मनोज जरांगे पाटील यांच्या १ डिसेंबर रोजीच्या नियोजन समितीच्या बैठकीतून रावसाहेब दानवे यांचे चुलत बंधू भास्कर पाटील दानवे यांना मराठा आंदोलकांनी बाहेर काढले होते. ओबीसी एल्गार मेळाव्याला आलेल्या नेत्यांसोबत जेवण करत त्यांची बडदास्त ठेवल्याचा भास्कर दानवे यांच्यावर आरोप होता. हे प्रकरण ताजे असतानाच आज नारायण कुचे यांनाही मराठा आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्याचा अनुभव आला.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.