Maratha Reservation News Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी आणखी एका युवकाने जीवन संपवलं !

Maharashtra Politics : गावाकडे येत असताना विष पिऊन अर्धापूर गावाजवळ त्याने आत्महत्या केली.

Mangesh Mahale

Nanded News : तीन दिवसांपूर्वी सुनील कावळे या तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना याच मागणीसाठी एका तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात ही घटना घडली आहे.

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करीत असल्याचे शुभम पवार याने लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे. मुंबईवरून परत गावाकडे येत असताना विष पिऊन अर्धापूर गावाजवळ त्याने आत्महत्या केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्यांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या मुद्द्यावर सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. शुभमने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज हदगांव-तामसा येथे बंद पाळला जाणार असल्याची घोषणा मराठा संघटनांकडून करण्यात आली आहे.

संभाजीनगर, बीड, राजगुरूनगर, जालन्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यात येत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षण प्रश्न तापवत शिंदे-फडणवीस सरकारला कोंडीत पकडलं आहे. त्यातच मराठा युवक आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करीत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहे.

या आत्महत्येनंतर शिंदे-फडणवीस सरकारविरोधात मराठा संघटना आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. "मराठा समाजातील युवकांनी आत्महत्या करू नये," असे आवाहन आंदोलक जरांगे पाटील यांनी सभेत केले आहे.

तीन दिवसापूर्वी जालन्यातील अंबडचे रहिवासी असलेल्या सुनील बाबुराव कावळे या तरुणाने मुंबईत आत्महत्या केली. त्याने टी-शर्ट आणि वहीच्या पानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करत असल्याचं लिहिलं आहे. त्यापूर्वी त्याने मनोज जरांगे पाटलांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर त्याने अचानक टोकाचं पाऊल उचललं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT