Aimim Chief Asaduddin Owaisi Rally in Latur
Aimim Chief Asaduddin Owaisi Rally in Latur Sarkarnama
मराठवाडा

मराठा आरक्षणावर निर्णय झाला तर मुस्लिमांनाही आरक्षण द्यावे लागले ; आम्ही गप्प बसणार नाही

दिपक क्षीरसागर

लातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील मुस्लिमांवर होणारा अन्याय दिसत नाही, त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते मुस्लिम धर्मगुरूंबद्दल अपशब्द काढतात ते देखील त्यांना ऐकू येत नाही. (Latur) मुस्लिम राष्ट्रांमध्ये विरोध सुरू झाल्यानंतर यांना कळते ही दुर्दैवाची बाब आहे, अशा शब्दात एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदोद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी भाजप व पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. मराठा आरक्षण दिले तर मुस्लिम आरक्षण देखील द्यावे लागेल, आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा देखील ओवेसी यांनी यावेळी दिला.

लातूर येथील जाहीर सभेत बोलतांना ओवेसी यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर देखील तोफ डागली. (Aimim) मुस्लिमांचे पुर्वज हे पुर्वी हिंदूच होते या आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या विधानाचा समाचार घेतांना भागवतांनी मुस्लीमांचा डीएनए तपासला आहे का ? असा सवाल देखील ओवेसी यांनी केला. ओवेसी दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर होते. नांदेडमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर लातूर येथे काल रात्री ओवेसींची जाहीर सभा झाली.

या सभेत आक्रमक भाषण करतांना ओवेसी म्हणाले, देशाच्या पंतप्रधानांना मुस्लिमांवरील अन्याय दिसत नाही ही शोकांतिका आहे. ठिकठिकाणी मुस्लिमांवर हल्ले होत आहेत, माॅबलिंचिंग सारखे प्रकार, अत्याचाराच्या घटना घडत असतांना त्यावर आमचे पंतप्रधान बोलायला तयार नाहीत. भाजपचे प्रवक्ते मुस्लिम धर्मगुरुंचा अवमान करतात, त्यावर देखील ते गप्प बसतात. मुस्लिम राष्ट्रांमधून विरोध सुरू झाला तेव्हा त्यांना जाग आली.

आमच्यावर भाजपची बी टीम म्हणून आरोप केला जातो, पण तो आरोप करणारे काॅंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना कधी भाजपचा विरोध करतांना दिसत नाही, आम्हीच भाजपचा तीव्र विरोध करतो. तो करत असतांना आमची पोरं जेलमध्ये गेली, आमच्या दुकानांवर दगडफेक केली, घर जाळली गेली, असा दावा देखील ओवेसी यांनी यावेळी केला.

राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन झाले, सरकारने देखील त्यासाठी प्रयत्न केले. राज्यात मुस्लिमांची संख्या देखील कमी नाही, आम्ही देखील बरोबरीत आहोत, त्यामुळे मराठा आरक्षणाचा विचार झाला तर तुम्हाला मुस्लिम आरक्षणावर देखील निर्णय घ्यावा लागेल, आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा देखील ओवेसी यांनी दिला.

आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत हे सतत मुलामानांविषयी भाषणात आमचे पूर्वज हिंदू होते असा दावा करतात. तुम्ही मुसलमानांचा डीएनए तपासला आहे का ? असा सवाल देखील ओवेसी यांनी उपस्थितीत केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT