Abhimanyu Pawar Sarkarnama
मराठवाडा

Ausa Assembly Election: औसा शहरासाठी पाचशे कोटींचा निधी आणला, विरोधकांनी एक काम दाखवावे- अभिमन्यू पवार

Abhimanyu Pawar challenges opposition to show work: विश्रांतीगृह, ग्रामीण रुग्णालय ते कारंजे खाडी केंद्र, खानापूर तांडा रोड अशी अनेक कामे प्रगतीपथावर

सरकारनामा ब्यूरो

Ausa News: औसा विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून या शहरासाठी पाचशे कोटींचा निधी मी आणला. यातून अनेक विकासकामे केली, लोकांना पायभुत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला.

माझ्यावर टीका करणाऱ्या विरोधकांनी एक तरी केलेले काम दाखवावे, असे आवाहन औसा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार अभिमन्यू पवार यांनी केले. औसा शहरातील मी केलेली काही ठळक विकासकामे लोकांसमोर जाऊन मांडत आहे, विरोधकांनी शहरात उभारलेले एखादे काम दाखवावे.

औसा शहरात मी आमदार म्हणून जवळपास 500 कोटींचा विकासनिधी दिला आहे. शहराला माकणी धरणातून प्रत्यक्षात पाणीपुरवठा सुरु केला आहे, वाढीव वस्त्यांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर आहे.

बसस्थानक, न्यायालयीन इमारत, मुख्य रस्त्याचा तिसरा टप्पा, भादा रोडवरील पूल, सार्वजनिक शौचालय, बाजार समितीकडे जाणारा रस्ता, तक्षशिला बौद्धविहार अशी अनेक कामे पूर्ण झाली आहेत. तर विश्रांतीगृह, ग्रामीण रुग्णालय ते कारंजे खाडी केंद्र, आलमला रोड, औसा तांडा रोड, खानापूर तांडा रोड अशी अनेक कामे प्रगतीपथावर आहेत.

जुने बसस्टॅण्ड ते टी पॉईंट, 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय अशा अनेक कामांची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली असून काही दिवसांतच कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. याव्यतिरिक्त शहरातील प्रत्येक प्रभागात, प्रत्येक गल्लीत रस्ता, नाली व सभागृहाची अनेक कामे पूर्ण झाली आहेत.

मी केलेली कामे तपशीलवार आणि फोटोसहित जनतेसमोर ठेवत आहे. हीच हिम्मत विरोधी उमेदवार दाखवतील का? 10 वर्ष आमदार असताना शहरात उभारलेले एखादे काम तरी दाखवता येईल का?, असा सवाल अभिमन्यू पवार यांनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT